आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या कार्यकािरणीत होणार दिवाळीपूर्वी फेरबदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आगामी जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये बदल करण्यात येणार आहेत. बुरूडगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉन येथे सोमवारी झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, सहसंपर्क प्रमुख श्रीकांत मोहिले विजय पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख संभाजी कदम, उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे, नगर तालुकाप्रमुख संदेश कार्ले, कर्जतचे बिभीषण गायकवाड, जामखेडचे शहाजी राळेभात, शेवगावचे भारत रोहकले, महापालिका स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव, सभागृह नेते अनिल शिंदे, नगरसेवक दिलीप सातपुते, विक्रम राठोड, संजय शेंडगे, अनिल बोरूडे, सुरेश तिवारी, मनोज दुलम, दिगंबर ढवण आदी उपस्थित होते.
या बैठकीत शहरासह तालुकानिहाय सभासद नोंदणीचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवायच्या की युती करून, याबाबतचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील बैठकीत होणार आहे. स्वबळावर निवडणुका लढवल्या, तर ऐनवेळी आपले बळ कमी पडायला नको. त्यासाठी सर्वांनीच कामाला लागले पाहिजे, असे आवाहन कोरगावकर यांनी यावेळी बोलताना केले.

जिल्हा कार्यकारिणीमध्ये दिवाळीपूर्वी फेरबदल करण्यात येणार आहेत. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे कोणाला वगळणार याची चर्चा लगेचच सुरू झाली आहे.

शहर प्रमुखपदाबाबत निर्णय नाही
नगरजिल्हा कार्यकारिणीत फेरबदल करण्यात येणार असल्याचे सोमवारी झालेल्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. शहरप्रमुख पद बदलाबाबत मात्र सध्या कोणताच निर्णय झालेला नाही. शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या भाऊ कोरगावकर यांनी मात्र शहरप्रमुख बदलाचा निर्णय लवकरच होणार असल्याचे स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...