आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena MP Bhausaheb Wakchaure Joins Congress News In Amrathi

वाकचौरेंना नाकारणे ही तेव्हाची चूकच - मुख्यमंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रीरामपूर - मागील लोकसभा निवडणुकीत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना तिकीट न देणो ही काँग्रेसची चूक होती. मात्र, आता त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने ती दुरुस्त होत आहे. वाकचौरे यांनी मांडलेल्या समस्या सोडवू, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी दिली.

इच्छामणी मंगल कार्यालयात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणाले, वाकचौरे यांनी मांडलेल्या मुळा-प्रवरा वीज संस्थेतील कामगारांची समस्या, निळवंडे कालवे, गोदावरी कालवे नूतनीकरण, तळेगाव एमआयडीसी आदी समस्या लवकरच सोडवल्या जातील. शिर्डी विमानतळाची धावपट्टी तयार झाली आहे. लवकरच तेथे विमान उतरेल.

पंचायतींच्या रूपांतराचे प्रस्ताव मांडल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीची संमती : वाकचौरे दारिद्रय़ावर मात करून वर आलेला माणूस आहे. गेल्या वेळी लादलेला उमेदवार लोकांना मान्य नव्हता. आता वाकचौरे सर्वांना चालतील. त्यांच्या प्रवेशाला राष्ट्रवादी काँग्रेसची संमती आहे, असे माजी मंत्री बाळासाहेब विखे यांनी स्पष्ट केले.

पुतळ्याचे दहन : वाकचौरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या निर्णयाचे संगमनेरमध्ये तीव्र पडसाद उमटले. वाकचौरे यांची ‘गद्दार’ अशी संभावना करत त्यांच्या पुतळ्याचे रविवारी (23 फेब्रुवारी) सायंकाळी शिवसैनिकांनी दहन करून वाकचौरेंच्या विरोधात घोषणाबाजी केली.