आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये शिवसैनिक-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत धुमश्चक्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गालबोट लागण्याचा प्रकार सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास नेता सुभाष चौकात घडला. दोन गणेश मंडळाचे राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकर्ते परस्परांना भिडले. पोस्टर दाखवणे व घोषणाबाजीचे रुपांतर दगड व बाटल्या फेकण्यात होऊन हाणामारीही झाली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगवला असून या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्रतिष्ठापना मिरवणुकीत सहभागी झालेल्या एका गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी माजी महापौर संग्राम जगताप यांचे पोस्टर उंचावून नेता सुभाष चौकात जोरदार घोषणाबाजी केली. याला प्रत्त्युत्तर देताना नेता सुभाष चौकातूनही आमदार अनिल राठोड यांचे पोस्टर उंचावून घोषणाबाजी करण्यात आली. कुणाला काही कळण्याच्या आत दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांनी परस्परांवर दगड व काचेच्या बाटल्या भिरकावण्यास सुरुवात केली. तर काही कार्यकर्ते परस्परांना भिडले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सौम्य लाठीमार करून जमाव पांगवण्यात पोलिसांना यश आले.

उपाधीक्षक श्याम घुगे म्हणाले, पोलिसांनी हा तणाव नियंत्रणात आणला असून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये. मिरवणुकीत आवाजाची पातळी ओलांडणार्‍या मंडळांवर कारवाई करण्यात येईल.