आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena News In Marathi, Electricity, Divya Marathi, Nagar

शिवसेना पदाधिका-यांनी धरले वीज कर्मचा-यांना धारेवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोपरगाव - शहरात वाढलेल्या अतिरिक्त व अनियमित भारनियमनासंदर्भात कोपरगाव शहर शिवसेनेने वीज वितरण कंपनीने आपल्या कारभारात सुधारणा न केल्यास शिवसेनास्टाईल उत्तर देऊ, असा इशारा देऊन वीज अधिका-यांना शनिवारी चांगलेच धारेवर धरले.

कोपरगाव शहराची वीज वितरण कंपनीची 100 टक्के वसुली असताना अचानक व केव्हाही भारनियमन केले जाते. या प्रश्नावर कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास हार घालून मोर्चास प्रारंभ झाला. शहरातील असंख्य नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.

शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख कैलास जाधव यांनी उपस्थित अधिका-यांना विजेची पुरेशी उपलब्धता असताना विनाकारण भारनियमन करून कोपरगावच्या जनतेस का त्रास देता, याबद्दल जाब विचारला. तुम्ही भारनियमनाची मनमानी अशीच चालू ठेवल्यास शिवसेनास्टाईलने उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला.

शहरप्रमुख भरत मोरे व विजय आढाव यांनीही वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना चांगलेच सुनावले. नगरसेवक योगेश बागूल यांनी निवेदनाचे वाचन केले. नियमित भारनियमन करताना कमीत कमी वेळ ठरवावी, वेळापत्रक जाहीर करावे, संपर्कासाठी दोन दूरध्वनी ठेवावे, ऑपरेटरकडून ग्राहकांना चांगली वागणूक मिळावी, वाढीव बिलांबद्दल तक्रारी येता कामा नये, सर्व्हिस वायर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्यांना घासून दुर्घटना घडू शकते. त्यावर उपाययोजना कराव्यात यासह अन्य मागण्या करण्यात आल्या. आवश्यकता असेल, तरच भारनियमन करू, असे आश्वासन अधिका-यांनी दिले.