आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena, Ramdas Kadam, Latest News In Divya Marathi

आघाडीच्या 30 मंत्र्यांना खडी फोडायला पाठवणार- रामदास कदम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-महाराष्‍ट्रात या वेळी भगवा फडकणार आहे. महायुतीची सत्ता आल्यानंतर मी गृहखाते मागून घेणार असून काँग्रेस आघाडीच्या 40 पैकी 30 भ्रष्ट मंत्र्यांना खडी फोडायला पाठवणार आहे, असे शिवसेनेचे उपनेते रामदास कदम यांनी रविवारी सांगितले. नगर तालुक्यातील सारोळा बद्दी येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.
या वेळी जिल्हा संपर्कप्रमुख सुहास सामंत, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, अनिल कराळे, मधुकर राळेभात, नगर तालुकाप्रमुख संदेश कार्ले, पारनेर तालुकाप्रमुख नीलेश लंके, पाथर्डी तालुकाप्रमुख रफिक शेख, कर्जत तालुकाप्रमुख बळीराम यादव, जामखेड तालुकाप्रमुख वैजनाथ पाटील, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय सदाफुले, टाकळी काझीचे सरपंच शंकर ढगे, सारोळा बद्दीच्या सरपंच मनीषा बोरुडे, योगिराज गाडे, विश्वास जाधव, बाळासाहेब ढगे उपस्थित होते.
कदम म्हणाले, अजित पवार यांचा सिंचन घोटाळा, त्याचबरोबर छगन भुजबळ, नारायण राणे आदी 30 मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्ट कारभाराची माहिती माझ्याकडे आहे.
त्यांचे घोटाळे बाहेर काढून या मंत्र्यांना आपण खडी फोडायला पाठवणार आहोत. मंत्र्यांच्या, आमदारांच्या ताब्यातील कारखान्यांचीही चौकशी केली जाईल. शिवसेनेशी दगाबाजी करून जे पुढारी इतर पक्षात गेले, त्यांचे नामोनिशाणही लोकसभेत राहिले नाही. महाराष्‍ट्रातील शिवसैनिक शेतक-यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 50 हजार सदस्यांची नोंदणी केली, तर आगामी निवडणूक सोपी होणार आहे. त्‍यादृष्‍टीने पदाधिका-यांनी काम केले पाहिजे.
स्वप्न साकारणार...
नगर येथील मेळाव्यात आमदार अनिल राठोड म्हणाले, ‘माझा महाराष्‍ट्र , भगवा महाराष्‍ट्र ’ हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. त्यांचे केंद्रातील स्वप्न साकार झाले, पण आता महाराष्‍ट्राचे स्वप्न साकार करायचे आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचा ध्यास शिवसैनिकांनी घेतला आहे. राष्‍ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य संभाजी दहातोंडे यांनी व्यासपीठावर हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.