आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापौरपदासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने लढणार, भाजपही राहणार बरोबर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आमदार संग्राम जगताप यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्यास पूर्ण ताकदीने महापौरपदासाठी लढण्याचा निर्णय शिवसेना नगरसेवकांच्या मुंबईत झालेल्या बैठकीत रविवारी घेण्यात आला. बैठकीत महापौरपदासाठी उमेदवार निश्चित झाला नसला, तरी नगरसेवक अनिल शिंदे, अनिल बोरुडे सचिन जाधव यांच्या नावावर चर्चा झाली असल्याचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.
आमदारकीची माळ गळ्यात पडल्याने संग्राम जगताप महापौरपदाचा राजीनामा देणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. २७ ला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ते राजीनामा देतील. त्यामुळे विराेधी पक्ष शिवसेना भाजप तयारीला लागले आहेत. काही झाले तरी महापौरपद मिळवायचे असा निर्धार शिवसेनेने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर माजी आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नगरसेवकांची शुक्रवारी नगरमध्ये बैठक झाली. बैठकीत महापौरपदाची निवडणूक पूर्ण ताकतीने लढण्याचा निर्णय घेण्यात आला. महापौरपदासाठी नगरसेवक अनिल शिंदे, अनिल बोरुडे, सचिन जाधव यांच्या नावावर चर्चाही झाली. परंतु त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी रविवारी पुन्हा मुंबईत बैठक झाली. मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला कोरेगावकर, राठोड, कदम, अनिल शिंदे, सुरेश तिवारी, सचिन जाधव आदी उपस्थित होते. प्रभाग १० साठी होत असलेल्या पोटनिवडणुकीबाबतही बैठकीत चर्चा झाली. जगताप यांनी राजीनामा दिलाच, तर युती पूर्ण ताकदीनिशी महापौरपदाची निवडणूक लढेल. त्यासाठी दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते स्वत: लक्ष घालून मार्गदर्शन करतील, असे आश्वासन वरिष्ठांनी दिले.
नाराजीची भीती आहेच
राष्ट्रवादीकाँग्रेसच्या प्रभाग दहामधील नगरसेविका विजया दिघे यांचे निधन झाल्याने या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची एका जागा सध्या कमी झाली आहे. शिवाय मनसे अपक्ष नगरसेवक यावेळी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मनसे अपक्षांनी साथ दिल्याने जगताप यांना सत्ता स्थापन करणे सोपे झाले होते. आता पुन्हा पूर्वीप्रमाणे राजकीय गणिते जुळतील की नाही, याबाबत शंकाच आहे. मनपात सत्ता स्थापन करताना विधानसभा निवडणूक लढवताना जगताप यांनी अनेकांना पदांचा शब्द दिला होता. दिलेला शब्द पाळल्याने अनेक नगरसेवक नाराज आहेत.
पुन्हा तारेवरची कसरत
जगतापराजीनामा देणार हे जवळपास निश्चित आहे. त्यांच्या जागी नगरसेवक अभिषेक कळमकर यांची वर्णी लागणार हेदेखील निश्चित आहे. परंतु शिवसेना-भाजप पूर्ण ताकदीने रिंगणात उतरले, तर कळमकर यांचा महापौरपदाचा मार्ग कठीण होईल. या पार्श्वभूमीवर कळमकर गटाने आतापासून जुळवाजुळव सुरू केली आहे. विशेष म्हणजे जगताप यांनी राजीनामा दिला, तरच कळमकर यांना महापौरपदाच्या खुर्चीवर बसवण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. त्यामुळे अपक्ष मनसे नगरसेवकांना सांभाळताना जगताप यांना पुन्हा एकदा तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
पक्षीय बलाबल
मनसे
०४
भाजप
०९
काँग्रेस
११
शिवसेना
१८
राष्ट्रवादी
१७
अपक्ष
०८
आमची पूर्ण तयारी आहे
- महापौर संग्राम जगताप राजीनामा देतील की नाही, याबाबत माहिती नाही. परंतु त्यांनी राजीनामा दिलाच, तर महापौरपदासाठी आमची तयारी पूर्ण झाली आहे. महापौरपदासाठी आमच्याकडे उमेदवारही आहेत. पूर्ण ताकदीने आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. पक्षपातळीवरून आम्हाला सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे आम्ही लढणारच.''
संभाजी कदम, शहरप्रमुख,शिवसेना
बातम्या आणखी आहेत...