आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजन्मोत्सवानिमित्त जिल्ह्यात 250 व्याख्याने, जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- संभाजी ब्रिगेडकडून जिल्हाभरात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्याचे नियोजन केले अाहे. यानिमित्त जिल्ह्यात २५० व्याख्याने होणार अाहेत, अशी माहिती ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश परकाळे यांनी दिली. जिल्हा कार्यकारिणीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.

ब्रिगेडतर्फे विविध प्रश्नांवर आंदोलने करून प्रश्न सोडवण्याचे काम काही वर्षांपासून सुरू आहे. मराठा आरक्षण, सीईटी पात्र डीएड पदविकाधारकांची नियुक्ती, चारा छावण्या, रस्त्याच्या कामातील गैरव्यवहार, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना डावललेली शिष्यवृत्ती, कृषी विद्यापीठ व प्रकल्पग्रस्तांची समस्या, जातीय सलोख्याची शिबिरे व मेळावे आदी माध्यमातून ब्रिगेडचा जिल्ह्यात प्रसार झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या दक्षिण भागात ४२५ गावांमध्ये ब्रिगेडने शिवजंयती साजरी करण्याचे नियोजन केले आहे. शिवजयंती साजरी करताना २५० पेक्षा अधिक व्याख्यानांचेही आयोजन करण्यात येणार आहे. तालुकानिहाय विविध स्पर्धा व आरोग्य शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती परकाळे यांनी दिली.
कार्यकारिणीच्या बैठकीत उपाध्यक्षपदी अॅड. ऋषिकेश गायकवाड, रवींद्र नवले यांची निवड करण्यात आली. कर्जत तालुकाध्यक्षपदी नीलेश तनपुरे, शहराध्यक्षपदी दत्तात्रय भोसले, श्रीगोंदे शहराध्यक्षपदी राजू मोरे यांची निवड करण्यात आली. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदमुक्त केले. जिल्हाध्यक्ष परकाळे, अतुल लहारे, विजय खेडकर, दत्ता साठे, चंद्रभान ठुबे, शरद जोशी, सुनील कदम, अवधूत पवार, दीपक तनपुरे आदी उपस्थित होते.