आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभेसाठी आमदार कर्डिलेंच्या नावाची चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाची जागा अबाधित ठेवण्यासाठी आमदार शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी मिळावी, या मागणीने आता जोर धरला आहे.

कर्डिले यांनी मागील पंधरा वर्षांत भरीव विकासकामे केली. पाच वर्षांपासून राहुरी व पाथर्डी तालुक्यातही अनेक विकासकामे त्यांनी मार्गी लावली. यावेळी नगर लोकसभा मतदारसंघात भाजपची पिछेहाट होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून राजीव राजळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. राजळे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपने मात्र अजून उमेदवार जाहीर केली नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. नगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड व शेवगाव तालुक्यातील जनतेशी कर्डिले यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे नगरची जागा पुन्हा मिळवण्यासाठी कर्डिले यांनाच उमेदवारी मिळावी, असा बापूसाहेब कुलट, नवनाथ वाघ, जालिंदर कुलट, खंडू काळे, सोमनाथ तांबे, अविनाश पवार, साहेबराव दळवी, रावसाहेब मोढवे, दिनेश शेळके आदी कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे.

भाजपकडून खासदार दिलीप गांधी व आमदार राम शिंदे इच्छुक आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आमदार कर्डिले यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी राजळे यांनी बंडखोरी केली. त्याचा फटका कर्डिले यांना बसल्याचे मानले जाते. त्यांना दुसर्‍या क्रमांकाच्या मतांवर समाधान मानावे लागले होते.

मागील वेळेप्रमाणे बंडखोरीचा फटका पक्षाला बसू नये, यासाठी राजळे यांना समन्वयाचा सल्ला देऊन राष्ट्रवादीने त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे भाजपला जोरदार मोर्चेबांधणी करावी लागणार आहे.