आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivaji Kardile News In Marathi, BJP, MLA, Divya Marathi

सत्ताधार्‍यांनी विकासकामे न करता स्वत:चे खिसे भरले, कर्डिले यांचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव - राज्यातील आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी विकासकामे न करता स्वत:चे खिसे भरण्याचे काम केले, असा आरोप करून शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचे आमदार चंद्रशेखर घुले यांची अवस्था, ‘धरले तर चावते अन् सोडले तर पळते’ अशी झाल्याची टीका भाजपचे आमदार शिवाजी क र्डिले यांनी रविवारी (23 मार्च) केली. राष्ट्रवादीच्या गळाला एक मासा लागला असला, तरी आम्ही दोनशे गळाला लावू, असेही ते म्हणाले.


नगर मतदारसंघातील उमेदवार खासदार दिलीप गांधी यांच्या प्रचारार्थ येथील र्शीनाथ मंगल कार्यालयात आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत कर्डिले बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार राम शिंदे होते. जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा, भाजपचे जिल्हा सरचिटणीस वाय. डी. कोल्हे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे, नरेंद्र मोदी आर्मीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पोटघन, सेनेचे संपर्कप्रमुख एकनाथ कुसळकर, तालुकाप्रमुख भारत लोहकरे, नेवासे भाजप तालुकाध्यक्ष दिनकर गज्रे, विष्णुपंत देहाडराय आदी यावेळी उपस्थित होते.
कर्डिले म्हणाले, ताजनापूर जलसिंचन योजनेचे पाणी हवे असेल, तर राजकीय परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. परिवर्तन होईल तेव्हाच ताजनापूर शंभर टक्के पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.


खासदार गांधी म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्ता खंबीरपणे पाठिशी उभा राहिल्याने मी विकासकामे करू शकलो. या मतदारसंघाने दोनदा परिवर्तन घडवले. आता तिसर्‍यांदा परिवर्तन घडवण्याचा संकल्प मतदारांनी केला आहे. सर्वसामान्यांच्या सदिच्छा आणि संकल्पाच्या जोरावर या निवडणुकीत निश्चित यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


आमदार शिंदे, अँड. अविनाश मगरे, वाय. डी. कोल्हे, अनिल कराळे, अशोक आहुजा, भानुदास हागे यांचीही भाषणे झाली. प्रास्तविक सुनील रासने यांनी केले, तर सूत्रसंचालन बाळासाहेब कोळगे यांनी केले.


प्रमुख पदाधिकार्‍यांची कार्यक्रमाकडे पाठ
भाजपचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती हर्षदा काकडे, अँड. शिवाजी काकडे, जिल्हा परिषद सदस्य अंजली काकडे यांच्यासह पंचायत समिती सदस्य व भाजपच्या तालुका पदाधिकार्‍यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.