आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजी शेलारांना श्रीगोंद्यातून उमेदवारी हवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विधानसभा निवडणुकीत श्रीगोंद्यातून उमेदवारी मिळावी, अशी मागणी भाजप भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी शेलार यांनी केली. निरीक्षक म्हणून आलेले आमदार चंद्रकांत पाटील व माधुरी मिसाळ यांची त्यांनी भेट घेतली.
माजी नगरसेवक नितीन शेलार यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पत्रात शेलार यांनी म्हटले आहे की, मी भटक्या समाजाचा असून चाळीस वर्षांपासून श्रीगोंदे तालुक्यात काम करत आहे. जिल्हा परिषद सदस्य, श्रीगोंदे खरेदी-विक्री संघाचा सदस्य, जिल्हा मजूर फेडरेशनचा संचालक म्हणून काम पाहिले आहे. वडार समाज संघटनेचा 10 वर्षे अध्यक्ष होतो. या समाजाला प्राधान्य मिळावे, यासाठी श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातून मला उमेदवारी द्यावी.