आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनशक्ती मंचाचे संस्थापक काकडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जनशक्ती मंचचे संस्थापक अ‍ॅड. शिवाजीराव काकडे व विद्यमान जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याबरोबरच जनशक्ती विकासआघाडीचेही भाजपमध्ये विलीनीकरण करण्यात आल्याची घोषणा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी केली.
महात्मा सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हा पक्ष प्रवेश करण्यात आला. यामध्ये जनशक्ती विकास आघाडीचे काकडे यांच्यासह मंचचे तालुकाध्यक्ष सुरेश चौधरी, भाऊसाहेब सातपुते, रामजी सातपुते, जगन्नाथ गावडे, देवराम दारकुंडे, पंडित नेमाणे, राजू पातकळ, कल्याण झिरपे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
प्रस्थापितांना धडा शिकवल्याशिवाय सर्वसामान्यांना जगता येणार नाही. यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वांना बरोबर घेऊन यश मिळवण्याचा निर्धार ढाकणे यांनी व्यक्त केला. प्रवेशानंतर अ‍ॅड. शिवाजी काकडे म्हणाले की, जनशक्ती मंच ही संघटना भाजपचाच पोटहिस्सा होता. आपण भाजपची कधीच फसवणूक केली नाही. तसेच यापुढील काळातही आम्ही दगाबाजी करणार नाही. राष्ट्रवादीला धूळ चारण्यासाठी जनशक्ती मंचचे विलीनीकरण करण्यात आल्याचे ते म्हणाले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ शर्मा, अशोक आहुजा, बाळासाहेब कोळगे, जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे आदी उपस्थित होते. भाजपाचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्र्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.