आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivesna's Corporator Subhash Londhe Enter Into Congress

शिवसेनेचे नगरसेवक सुभाष लोंढे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- आगामी महापालिका, लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नगरसेवक सुभाष लोंढे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, अशी माहिती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी शुक्रवारी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत वर्षा बंगल्यावर लोंढे यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, आदी उपस्थित होते. लोंढे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश ही राजकीय परिवर्तनाची नांदी आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करणार्‍यांची योग्य प्रतिष्ठा राखण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते लोंढे यांचा सत्कार करण्यात आला. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लोंढे यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी केल्याचे सारडा यांनी सांगितले.