आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचपुते विरोधाचा शिवसेनेचा बार ठरला फुसका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आमदार बबनराव पाचपुते यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला विरोध करण्याच्या प्रयत्नांत नगर तालुका शिवसेना पूर्णपणे एकाकी पडल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट झाले. बाजार समितीच्या कार्यालयात मंगळवारी झालेल्या या पत्रकार परिषदेला तालुक्यातील एकही भाजप पदाधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे पाचपुते विरोधाचा शिवसेनेचा बार फुसका ठरल्याची चर्चा आहे.

पाचपुतेंच्या संभाव्य भाजप प्रवेशाला विरोध करण्यासाठी वाळकी व चिचोंडी पाटील जिल्हा परिषद गटातील युतीचे पदाधिकारी पत्रकार परिषद घेणार असल्याचा निरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला होता. पत्रकार परिषदेस फक्त वाळकी व चिचोंडी पाटील गटातील कार्यकर्तेच उपस्थित होते. नगर तालुक्यातील भाजपचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. पत्रकार परिषद सुरू होण्यागोदर काही मिनिटे भाजपच्या बाजार समिती संचालकानेही काढता पाय घेतला. शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदेश कार्ले, विभागप्रमुख अजय बोरूडे, जि. प. सदस्य दत्तात्रेय सदाफुले, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गाडे, योगिराज गाडे, उपतालुकाप्रमुख शंकर ढगे ,पंचायत समिती सदस्य विश्वास जाधव, पोपट ढगे, रामदास भोर, दिलीप शिंदे यावेळी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेस भाजप पदाधिकाऱ्यांना उपस्थित ठेवण्याची जबाबदारी बाजार समितीचे सभापती हरिभाऊ कर्डिले व बाजीराव गवारे यांच्यावर सोपवण्यात आली होती. पण या दोघांसह सर्वच भाजप पदाधिकारी गैरहजर रािहले. भाजप पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत शिवसेनेकडून सारवासारव करण्यात आली, पण भाजपने नगर तालुका शिवसेनेला तोंडघशी पाडल्याची चर्चा रंगू लागली आहे.

भाजपचे तालुकाध्यक्ष शरद दळवी यांनी आपल्याला पत्रकार परिषदेचा निरोपच नसल्याचे सांिगतले. बाजार समितीचे सभापती हरिभाऊ कर्डिले म्हणाले, आपण रविवारपासून बाहेरगावी असून दुपारी ४ वाजता आपल्याला पत्रकार परिषदेबाबत संदेश कार्ले यांनी निरोप दिला. पण गणपतीपुळे येथे असल्याने नगरला येणे शक्य नव्हते. इतर पदाधिकारी का नाही पत्रकार परिषदेस आले ते आपण सांगू शकत नाही, असे कर्डिले यांनी सांगितले.
जनतेच्या विश्वासाला पात्र राहणार का...
बबनराव पाचपुते यांनी वेळोवेळी "माझे पंढरपूर बारामती असून शरद पवार हेच माझे विठ्ठल आहेत' असे सांगितले आहे. पण आता स्वत:ला वैष्णव समजणारे पाचपुतेच शरद पवारांवर टीका करत त्यांना सोडून चालले आहेत. भागवत धर्माची पताका हातात घेतलेले पाचपुते भागवत धर्माचे नियम विसरलेत काय, पाचपुतेरूपी जो भक्त स्वार्थासाठी स्वत:च्या पांडुरंगालाही सोडण्यास मागे-पुढे पहात नाही, तो सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला कितपत पात्र राहील, असा प्रश्न शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदेश कार्ले यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.