आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेला सापत्न वागणूक; पाचपुतेंबाबत चकार शब्दही नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कल्याण-विशाखापट्टणम रस्त्याच्या रुंदीकरणाच्या भूमिपूजनासाठी भाळवणीत झालेल्या कार्यक्रमात भाजपकडून शिवसेनाला सापत्नभावाची वागणूक देण्यात आली. मंत्री नितीन गडकरी येण्यापूर्वी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर तोंडसुख घेत त्यांच्या संभाव्य भाजपप्रवेशाला विरोध करणाऱ्या नेत्यांच्या भाषणांविषयी गडकरी यांनी चकार शब्दही उच्चारला नाही.
भूमिपूजन, पाणी परिषद व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी प्रमुख व्यासपीठाशेजारी स्वतंत्र उपव्यासपीठ उभारण्यात आले होते. शिवसेनाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. ते मुख्य व्यासपीठावर बसतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ते उपव्यासपीठावर भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या शेजारी बसले. मुख्य व्यासपीठावर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, खासदारपुत्र नगरसेवक सुवेंद्र गांधी विराजमान असताना शिवसेनाच्या जिल्हाप्रमुखांना उपव्यासपीठावर बसावे लागले. स्थानकि आमदार म्हणून विजय औटी मुख्य व्यासपीठावर होते. मित्रपक्ष म्हणून शिवसेनाला असलेले स्थान भाजपने या कार्यक्रमात अव्हेरले.
गडकरी कार्यक्रमास्थळी पोहोचण्यापूर्वी श्रीगोंद्याच्या स्थानकि नेत्यांची उपस्थितांसमोर भाषणे झाली. श्रीगोंद्यासह इतर ठकिाणच्या पदाधकिाऱ्यांनी पाचपुते यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला कडाडून विरोध केला. कडक भाषेत पाचपुते यांच्यावर तोंडसुख घेतले. मात्र, गडकरी यांनी पाचपुते यांच्यासंदर्भात चकार शब्दही त्यांच्या भाषणात काढला नाही. भाषणात कोणताही पत्रकार मला उलट प्रश्न विचारु शकत नाही, असे म्हणणाऱ्या गडकरी यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलणेच टाळले. पाचपुते यांच्यासंदर्भातील प्रश्नाच्या धास्तीनेच त्यांनी सुटका करून घेतल्याची चर्चा होती.

फोटो - उपव्यासपीठावर बसलेले शिवसेनाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे. समवेत माजी आमदार चंद्रशेखर कदम व भाजप पदाधिकारी. छाया : अमोल भांबरकर