आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर कारखान्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दुष्काळाची छाया गडद होत असून जिल्ह्यातील पशुधन वाचवण्यासाठी ऊस शिल्लक राहणे आवश्यक आहे, अशी भूमिका घेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी साखर कारखान्यावर हल्लाबोल केला. शिवसैनिकांनी र्शीगोंद्यातील तीन, शेवगाव, पाथर्डी आणि कर्जतमधील प्रत्येकी एका कारखान्याचे कामकाज ठप्प केले. पशुधन जगवण्यासाठी चारा शिल्लक राहणे आवश्यक आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी तत्काळ गाळप बंद करावे, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने 15 दिवसांपूर्वी करण्यात आले होते. मात्र, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी हे आंदोलन केले. दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, पारनेर तालुकाप्रमुख नीलेश लंके, र्शीगोंदा तालुकाप्रमुख बाळासाहेब काटे, महिला आघाडीच्या सुजाता कदम, नंदू ताडे, भाऊसाहेब गोरे यांनी साईकृपा, र्शीगोंदा व कुकडी कारखाना कार्यस्थळावर जाऊन काही काळ ते बंद पाडले.