आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युतीचा वाद अपक्षांच्या पथ्यावर; पुरस्कृतांची नावे सेना आज जाहीर करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शिवसेना-भाजपमध्ये निर्माण झालेला वाद अपक्ष व बंडखोर उमेदवारांच्या चांगलाच पथ्यावर पडला आहे. ज्यांनी उमेदवारी नाकारली, तेच पक्ष आता मनधरणी करत असल्याने अपक्षांचा भाव वधारला आहे. भाजपने दिलेल्या 11 जागांवर शिवसेनेचा काहीच संबंध राहणार नसल्याचे आमदार अनिल राठोड यांनी स्पष्ट केले आहे. या जागांवर शिवसेनेकडून अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करण्यात येणार असून त्यांची नावे गुरुवारी जाहीर करण्यात येणार आहेत.
जागावाटपावरून निर्माण झालेला वाद उमेदवारीवरून पुन्हा उफाळून आला आहे. भाजपने राष्ट्रवादीशी छुपी युती करून 11 जागांवर उमेदवार आयात केले. त्यामुळे या जागांशी सेनेचा काहीच संबंध नसल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले. या जागांवर शिवसेनेतर्फे अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करण्यात येणार आहे. त्यांची नावे गुरूवारी जाहीर होणार आहेत. शिवसेनेच्या या पवित्र्यामुळे 11 जागांवरील भाजप उमेदवारांनी त्यांच्या प्रचारपत्रकावरील राठोड यांचे नाव, छायाचित्र व चिन्ह काढून टाकले आहे. या जागांवर शिवसेनेतर्फे पुरस्कृत करण्यात आलेल्या उमेदवारांनी मात्र राठोड यांचे नाव व शिवसेनेचे चिन्ह असलेली पत्रके छापून घेतली आहेत.