आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर जिल्ह्यात शिवसेनेचा हल्लाबोल; दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून चारा डेपो सुरू ठेवावेत, या मागणीसाठी हजारो शिवसैनिकांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. दुष्काळी उपाययोजनांबाबत मंत्री गंभीर नसल्याचा आरोप नेत्यांनी यावेळी केला.
दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात तालुकाप्रमुख संदेश कार्ले, पं. स. सभापती सुनीता नेटके यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. मार्केटयार्ड चौकातून निघालेला हा मोर्चा माळीवाडा, पंचपीर चावडीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. नंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी गाडे म्हणाले, राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात व बबनराव पाचपुते हे तिघेही मंत्री शेतकर्‍यांची मुले म्हणवतात. परंतु त्यांना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे काही देणे-घेणे नाही. जिल्ह्यात पाणी व चार्‍याची टंचाई निर्माण झाली असताना त्याबाबत एकही मंत्री गंभीर नाही. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न अनुत्तरित असताना 15 ऑगस्टनंतर चारा डेपो बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चारा डेपो बंद झाले, तर पशुधन कसायाच्या दावणीला जाईल. पशुधन वाचवायचे असेल, तर चारा उपलब्ध व्हायला व्हायला हवा. चार्‍यापोटी शेतकर्‍यांकडून घेतलेली 25 टक्के रक्कम परत करावी, टँकर परस्पर बंद न करता मागणी व गरज असेल तेथे पुरवावेत, पीकविम्याबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा, रात्रीचे भारनियमन रद्द करावे या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. संजीव कुमार यांना देण्यात आले.