आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रावणी सोमवार: डोंगरगणला लोटली भाविकांची मांदियाळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- तिसर्‍या श्रावणी सोमवारी डोंगरगण येथील रामेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांनी आसपासच्या दर्‍याखोर्‍यांत फिरून निसर्गसौंदर्याचाही आनंद लुटला.
नगरपासून 22 किलोमीटर अंतरावर डोंगरगण आहे. निसर्गरम्य परिसरात हे गाव वसले आहे. रामायण काळात र्शीराम, सीता व लक्ष्मण यांचे वास्तव्य काही दिवस येथे असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिराजवळ असलेल्या गुहेत सीतेचे न्हाणीघर आहे.
श्रावण महिन्यात दर सोमवारी भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. तिसर्‍या सोमवारी मोठी यात्रा भरते. यात्रोत्सवानिमित्त जिल्ह्यासह राज्यभरातील भाविक दर्शनासाठी आले होते.
यंदा समाधानकारक नसला, तरी थोडा पाऊस झाल्यामुळे डोंगरगण, वांबोरी घाट व गोरक्षनाथ गड हिरवळीने सजला आहे. दर्‍यांमध्ये झुळझुळ वाहणारे पाणी व झिरपणारा डोंगर पर्यटकांना मोहिनी घालत आहे. यात्रेत बालकांनी रहाट व पाळण्यात बसण्याचा आनंद लुटला. शेतकर्‍यांनी आता बैलपोळ्याची तयारी सुरू केली आहे. बैलपोळ्याचे घुंगरमाळा, आसूड, मुथळी, गोंडे आदी साहित्य खरेदीसाठी शेतकर्‍यांनी गर्दी केली होती.