आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्री स्वामी समर्थ यांचे अस्सल छायाचित्र नगरमध्ये उपलब्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अक्कलकोटचे स्वामी समर्थांचे कोट्यवधी भक्त आहेत. स्वामी भक्तांना आतापर्यंत स्वामींची फक्त चित्रे उपलब्ध होती. आता त्यांचे अस्सल छायाचित्र नगरमध्ये उपलब्ध झाले आहे. विशेष म्हणजे, ते सन 1875 मधील आहे. स्वामी समर्थांचे भक्त दीपक शाह यांनी भाविकांसाठी ते मोफत उपलब्ध केले आहे.

आज छायाचित्रणाची कला शिखरावर आहे. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे शर्टच्या बटनांमध्ये काय, पण शरीरातील रक्त वाहिनीत जाऊ शकणारे कॅमेरे तयार झाले आहेत. या काळात स्वामी समर्थांच्या छायाचित्राची कथाही विलक्षण आहे. स्वामींचे पुण्यातील एका भक्ताने आपले नाव कोणत्याही परिस्थितीत न छापण्याच्या अटीवर ही माहिती ‘दिव्य मराठी’ला दिली.
जॉर्ज इस्मन कोडॅक यांनी सन 1850 ते 56 दरम्यान कॅमेरा तयार केला. खर्‍या अर्थाने ते कॅमेर्‍याचे जनक. त्यावेळी त्यांची कोडॅक कंपनीच स्वत: छायाचित्रे काढायची. त्यावेळी छायाचित्रकाराला स्वत: प्लेट तयार करून त्यावर सिल्व्हर नायट्रेट हे रसायन लावून छायाचित्र काढावे लागायचे.

मार्केटिंगसाठी कंपनीने त्यांचा एक प्रतिनिधी भारतात पाठवला. तो मुंबईला आला. तेथे त्याला स्वामी समर्थांबद्दल समजले. त्यावेळी चार जानेवारी 1970 च्या ‘थिआॅसॉफिस्ट’च्या अंकात स्वामींच्या दर्शनाला वर्षाला चार लाख लोक अक्कलकोटला जातात, असे वर्णन छापून आले होते. ते कोडॅक कंपनीच्या संबंधित प्रतिनिधीच्या पाहण्यात आले. त्याने अक्कलकोटला जाण्याचे ठरवले. तो रेल्वेने कुर्डूवाडीला गेला. तेथून तो अक्कलकोटला बैलगाडीने जावे लागले. तो स्वामींपर्यंत पोहोचला. त्याने स्वामींची परवानगी घेऊन त्याच्या खोक्यासारख्या कॅमेर्‍यातून स्वामींची 33 छायाचित्रे काढली. परवानगी न घेता काढलेले एकही छायाचित्र आले नाही, असे स्वामींच्या भक्ताने सांगितले. यापैकी 22 छायाचित्रांच्या निगेटिव्ह कंपनीने जतन केल्या आहेत. ही घटना 1875 मधील आहे. त्यानंतर स्वामी नगरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांचे शिष्य वांबोरीकर यांच्या घरीही त्यांचे छायाचित्र इंग्लंडमधील बुथवेल सॅमसन छायाचित्रकाराने काढले. तेही शाह यांच्या संग्रहात आहे.
स्वामी समर्थ भक्तांना मिळणार मोफत प्रत
स्वामी समर्थांच्या अस्सल छायाचित्रांपैकी एक शाह यांना उपलब्ध झाले. त्याच्या त्यांनी शेकडो प्रती काढल्या आहेत. या प्रती त्यांनी भाविकांसाठी मोफत उपलब्ध केल्या आहेत. इच्छुक भाविकांनी दीपक शाह, बंगला क्रमांक 4, पत्रकार वसाहत, सावेडी रोड येथे (9209223123) संपर्क साधण्याचे आवाहन शाह यांनी केले आहे.
फोटो - कोडॅक कंपनीच्या छायाचित्रकाराने 1875 मध्ये अक्कलकोट येथे स्वामी समर्थ यांचे काढलेले छायाचित्र. तर दुसर्‍या छायाचित्रात 6 एप्रिल 1876 रोजी स्वामी समर्थ व त्यांचे नगरमधील शिष्य वामनबुवा वांबोरीकर यांचे नगरमधील छायाचित्र.