आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काष्टीतून पालकमंत्र्यांच्या ‘होममिनिस्टर’च हव्यात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदा: जिल्हा परिषदेच्या काष्टी गटातून पालकमंत्र्यांच्या ‘होममिनिस्टर’च उमेदवार हव्यात, अशी एकमुखी मागणी काष्टी ग्रामस्थांनी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडे केली.
काष्टीतील राजयोग मंगल कार्यालयात गुरुवारी ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. पालकमंत्र्यांसह त्यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते, सदाशिव पाचपुते, विठ्ठल काकडे, भगवान पाचपुते, अरुण पाचपुते, अनिल पाचपुते आदी यावेळी उपस्थित होते. ग्रामस्थांनी स्पष्टपणे भूमिका मांडताना जर काँग्रेसचे तगडे आव्हान मोडायचे असेल तर पाचपुते यांच्या घरातीलच उमेदवार आवश्यक आहे. त्याकरिता प्रतिभा पाचपुते यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली. घरातील कारभार्‍यांनी या मागणीला विरोध न करता त्यांच्या उमेदवारी निश्चित करावी, अशी आग्रही मागणी केली. माजी सभापती अरुण पाचपुते यांनी आपण उमेदवारीसाठी इच्छुक आहे. मात्र, पक्ष ठरविल तो निर्णय अंतिम मानून काम करू असे सांगितले. काकडे यांनी भाषणात काष्टीतील मतदानच निर्णायक ठरणार असल्याने वेळप्रसंगी गट व गण या दोन्हींसाठी पक्षाने येथूनच उमेदवार द्यावेत, अशी मागणी केली. भगवान पाचपुते यांनी अशा पध्दतीने उमेदवार्‍या दिल्यास राष्ट्रवादीला हमखास यश मिळेल असे सांगितले. पालकमंत्र्यांनी पक्षाला पूर्ण यश कसे मिळेल, यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. आपणास प्रचारासाठी राज्यात जावे लागणार असल्याने तालुका व काष्टीचा निर्णय सर्वांनी एकत्रित घ्यावा असे ते म्हणाले.