आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shrigonda Municipal Council New Elected Member Not Seat Long Time

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीगोंदे नगरपालिकेच्या नूतन पदाधिकार्‍यांचे राज्य औटघटकेचे ठरणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे - सुनीता खेतमाळीस, नानासाहेब कोथंबिरे यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर येणार्‍या नूतन पदाधिकार्‍यांचे राज्य हे औटघटकेचे ठरणार आहे. या वर्षाअखेरीस श्रीगोंदे नगरपालिकेची निवडणूक असल्याने आचारसंहितेतच या पदाधिकार्‍यांचा निम्मा कार्यकाळ जाणार आहे.


नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष राजीनामे जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार स्वीकारले आहेत. नूतन पदाधिकार्‍यांची निवड 29 ऑगस्टला होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी हिराबाई सिदनकर यांचे एकमेव नाव स्पध्रेत आहे. उपनगराध्यक्षपदासाठी संतोष क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पसंती दिली आहे. डिसेंबर 2013 अखेर किंवा जानेवारी 2014 च्या पहिल्या आठवड्यात पालिकेची निवडणूक अपेक्षित आहे. यामुळे नव्या पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ जेमतेम चार महिन्यांच्या असेल. त्यातही चाळीस दिवस आचारसंहिता राहील. या दरम्यान उत्कृष्ट कामगिरी करून दाखवणे हे त्यांच्यासमोर आव्हान असेल. राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार बबनराव पाचपुतेंनी खांदेपालटाचा निर्णय घेतला असला, तरी त्यातून काही साध्य होईल, असे दिसत नाही. राष्ट्रवादीच्या दोघा नगरसेवकांनी दबावतंत्र वापरून मावळत्या नगराध्यक्षांची बदनामी मोहीम सुरू केली आहे. राजीव राजळेंच्या कार्यक्रमाला हजेरी लावून तसेच विरोधकांना पालिकेतील कागदपत्रांसह माहिती पुरवून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची कोंडी केली. याची बक्षिसी म्हणून हा बदल केल्याची चर्चा नाराज नगरसेवकांच्या गोटातून ऐकायला मिळत आहे.