आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगोंद्याच्या पाणीप्रश्नी सर्वपक्षीय एकजूट दुभंगली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - कुकडी व घोडच्या पाणीप्रश्नावर आठ दिवसांपूर्वी झालेली तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांची एकजूट मंगळवारी दुभंगली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आमदार बबनराव पाचपुते व माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र शिष्टमंडळे भेटली.

सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रितपणे घोड व कुकडीच्या पाणीप्रश्नी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे आठ दिवसांपूर्वी ठरले होते. पण आठ दिवसांच्या आतच एकजूट दुभंगली. नागवडे यांच्या नेतृत्वाखाली ‘कुकडी’चे अध्यक्ष राहुल जगताप, भाजपचे राजेंद्र म्हस्के यांचे शिष्टमंडळ दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटले. पाचपुतेंवर आमचा विश्वास नाही. तुम्हीच आमचे मायबाप आहात. पाणीप्रश्नी तत्काळ निर्णय घ्या, असे या शिष्टमंडळाने सांगितले. दरम्यान, आमदार पाचपुतेही स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्यांना भेटले. घोड-कुकडीसाठी तत्काळ पाणी सोडण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, जलसंपदा राज्यमंत्री शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक उशिरापर्यंत सुरू होती. या बैठकीस विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे, आमदार वल्लभ बेनके, पाचपुते, विजय औटी, राम शिंदे, रश्मी बागल आदी उपस्थित होते.