आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shrigonda Water Issue No Comment From Chif Minister

श्रीगोंदे पाणीप्रश्न; मुख्यमंत्री ‘कुल-कुल’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - तालुक्याच्या पिण्याच्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची चालढकल करण्याची पद्धत पुन्हा एकदा पहायला मिळाली. पाणी सोडण्याच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद ‘कुल-कुल’ असल्याचे त्यांना भेटलेल्या शिष्टमंडळातील सदस्यांकडून समजले आहे.

मंगळवारी (1 जुलै) सायंकाळी तालुक्यातील नेतेमंडळी माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या नेतृत्वाखाली पाणीप्रश्नी मुख्यमंत्र्यांना भेटले. नागवडे यांनी पाणीप्रश्नाची तीव्रता मांडली. भाजपचे राजेंद्र म्हस्के व जिल्हा परिषद सदस्य राहुल जगताप यांनी पुणे जिल्ह्यातील नेते नगरवर पाणीप्रश्नी कसा अन्याय करतात हे कथन केले. या सर्व नेत्यांचे म्हणणे ऐकून मुख्यमंत्र्यांनी ‘पाहू, विचार करू’ असे पठडीतील उत्तरे दिल्याची माहिती शिष्टमंडळातील भूषण बडवे यांनी दिली. पाणी कसे सोडता येईल, याचा सकारात्मक विचार करू, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी जगताप यांच्या प्रश्नावर दिले. दोन टीएमसी पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन माजी आमदार नागवडे यांना दिले. पाणी प्रश्नी मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद थंड होता, असे म्हस्के यांनी सांगितले.

कालवा सल्लागारची बैठक निरर्थक
‘कुकडी’च्या कालवा सल्लागार समितीच्या मुंबईच्या बैठकीत पाणी सोडण्याबाबत निर्णय झाला नाही. 15 जूननंतर शेतीसाठी पिण्याचे पाणी सोडायचे नाही, हे सरकारचे धोरण यावेळी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे मांडले. पिण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय नगर, सोलापूर व पुण्याच्या जिल्हाधिकाºयांच्या अहवालानंतर घेतला जाईल, असे ठरले. कोणताही ठोस निर्णय न होता बैठक पार पडली. बैठकीस सहा आमदार हजर होते.
फोटो - डमी पिक