आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shrihari Aney Challenge To Shivasena, Say, Also Stat Governmet Can\'t Overthrown Me

राज्य सरकारही मला हटवू शकत नाही, अणे यांचे सेनेला अाव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ‘शिवसेनेच्या नेत्यांनी माझ्या हकालपट्टीची मागणी करून उपयोग नाही. ही मागणी करणारे सरकारमध्ये असले तरीही तेच काय, सरकारही माझ्या पदाला धक्का लावू शकत नाही. माझी नियुक्ती राज्यपालांनी केलेली आहे. ते सांगतील तेव्हाच मी या पायउतार होईल’, अशी भूमिका राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी शनिवारी पत्रकारांशी बाेलताना मांडली.

अणे यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर अजूनही ठामच असल्याचे ठासून सांगितले.
‘भाजपचीही वेगळा विदर्भ व्हावा, अशी भूमिका आहे. तसा ठराव त्यांनी पक्षाच्या अधिवेशनात केलेला आहे. राज्याचे विभाजन करण्याचा अधिकार जरी केंद्र सरकारला असला तरी राज्याने त्यासाठी पाठपुरावा करायला हवा. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे पक्ष वेगळ्या विदर्भाच्या विरोधात आहेत. पण, विदर्भातील जनतेचे मतही आजमावून पाहायला हवे. तीच पद्धत बेळगावबाबतही वापरावी. भाजप सरकारने त्यासाठी पाठपुरावा करायला हवा’, असा पुनरुच्चार अणे यांनी केला.
मराठवाडा शांतच
मी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करीत नाही. पण, विदर्भापेक्षा मराठवाड्याची परिस्थिती बिकट आहे. मात्र त्यावर कोणीही बोलत नाही. विदर्भाच्या बाजूने माझ्यासारखे काही लोक बोलतात. पण, मराठवाड्यातील लोक अजूनही शांतच आहेत. त्यांनीही पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा अणे यांनी व्यक्त केली.