आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीरामपूर येथील ठाण्यात पोलिस कर्मचार्‍यांत राडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी दोन पोलिस कर्मचार्‍यांमध्येच जोरदार मारामारी झाली. पूर्वी गुन्हे शाखेत असलेल्या पोलिसाने वाहतूक शाखेतील एका पोलिसाला धक्का लागल्याच्या कारणाने चोप दिला. वरिष्ठांच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण मिटवण्यात आले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
एका पोलिसाला दुसर्‍या पोलिसाचा धक्का लागल्याचे निमित्त होऊन भांडण सुरू झाले. एका पोलिसाला मारहाण झाली. उपस्थित असलेल्या अन्य पोलिसांनी हे भांडण मिटवले. पोलिस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी संबंधित दोघांना बोलावून घेतले. मार बसलेल्या पोलिसाने फिर्याद नोंदवावी, असे त्यांनी सांगितले. त्याला पोलिसाला अर्शू आवरता आले नाहीत. परस्परविरोधी फिर्यादी दाखल करून घेतल्या जातील, असे सांगून अधिकार्‍यांनी भांडण मिटवले.
या प्रकाराची माहिती शहरात वेगाने पसरली. यासंदर्भात निरीक्षक सपकाळे यांच्याशी संपर्क साधला असता, दोघा पोलिस कर्मचार्‍यांत शाब्दिक चकमक झाली. वाद चेष्टामस्करीतून झाला. हे प्रकरण मिटले आहे, असे त्यांनी सांगितले. उपअधीक्षक अंबादास गांगुर्डे यांनी घटनेला दुजोरा दिला.