आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shubhada Kulkarni's Surat Dhund Mi Book Publication News In Marathi

वृत्तपत्रातील बातमीतून गवसले कादंबरीचे बीज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - येथील शुभदा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या "सुरात धुंद मी' व "जानकी' या दोन पुस्तकांचे प्रकाशन "आम्ही साऱ्याजणी' या साहित्यप्रेमी महिला ग्रूपतर्फे ज्येष्ठ समीक्षक डॉ. लीला गोविलकर यांच्या हस्ते मंगळवारी झाले.
आपल्या लेखनाविषयी शुभदा म्हणाल्या, दोन-तीन महिने माझ्या मनात कल्पनांचा खेळ चालला होता. नंतर त्यातून संपूर्ण कादंबरी साकार झाली. गायनात दंग झालेल्या गायकाचा सर्पदंशाने मृत्यू ही बातमी मी वृत्तपत्रात वाचली. ती वाचल्यानंतर "सुरात धुंद मी' ही कादंबरी मी लिहिली. ती लिहिण्यापूर्वी संगीतावर आधारित पुस्तके मी वाचली. जानकी ही कांदबरीदेखील अशीच साधुसंत, संन्याशी, युती, मुनी यांची प्रवचने एेकल्यानंतर सूचली. लहानपणापासून असलेला वाचनाचा व लेखनाचा छंद मी मनापासून जोपासला, असे त्यांनी सांगितले.
शोभा ढेपे यांची कन्या डॉ. ऋचा ढेपे-खरे यांनी एमएस, डीएनबी या परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी निर्मला मांडे, माधवी कुलकर्णी, ज्योती केळकर, ज्योत्स्ना कुलकर्णी आदी उपस्थित होत्या.