आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चमत्काराचा दावा ठरला फोल... अध्यक्षपदी सीताराम गायकर उपाध्यक्षपदी वाघ यांची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा सहकारी बँकेच्या पदाधिकारी निवडीत चमत्कार घडवण्याचा आमदार शिवाजी कर्डिले यांचा दावा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी या दाव्याचे केलेले समर्थन शुक्रवारी फोल ठरले. बँकेत राजकारण आणायचे नसल्याने चमत्कारासाठी खटाटोप केला नसल्याचे स्पष्टीकरण आमदार कर्डिले यांनी पदाधिकारी निवडीनंतर दिले. चमत्काराऐवजी बिनविरोध निवडीला विनाअट पाठिंबा देण्याची वेळ विखे गट भाजपवर आली.

जिल्हा बँकेच्या इतिहासात अतिशय चुरशीची लढत म्हणून यंदा बँकेच्या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. सत्ता कायम ठेवण्यासाठी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी, तसेच आमदार कर्डिले यांना सोबत घेत सुरुवातीला मोट बांधली होती. विखे यांनी सावध पवित्रा घेत थेट मुख्यमंत्र्यांशी संधान साधत भाजपलाच सोबत घेण्याची खेळी शेवटच्या टप्प्यात केली. एकूण २१ संचालक पदांसाठी निवडणूक झाली. अर्ज माघारीच्या शेवटच्या मुदतीपर्यंत विविध कार्यकारी सेवा सोसायटीतील सहा जागा बिनविरोध ठरल्या. उर्वरित १५ जागांसाठी मतदान झाले. राष्ट्रवादी थोरात गटाने ११ जागा मिळवत काठावरील बहुमत मिळवले. मे रोजी निकाल लागल्यानंतर कर्डिले यांनी पदाधिकारी निवडीत चमत्कार घडेल, असा दावा केला. त्यानंतर आठवडाभराच्या आतच विखे यांनी नगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्डिले यांच्या विधानाची पुष्टी करत चमत्काराचे संकेत दिले होते.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी थोरात गटाने सुरुवातीपासून सावध पावले उचलली. त्यातच राष्ट्रवादीमध्ये अध्यक्षपदासाठी चुरस सुरू झाली. माजी मंत्री मधुकर पिचड यांनी अध्यक्षपदासाठी गायकर यांच्या नावाचा आग्रह धरला, तर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची नावेही चर्चेत आली. त्यामुळे अध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्याचा चेंडू माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोर्टात टोलवला गेला. २१ रोजी पुण्यात झालेल्या झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते नवनिर्वाचित संचालकांची मते पवार यांनी जाणून घेतली. राहुरीसोसायटी मतदारसंघाचे संचालक अरुण तनपुरे राष्ट्रवादीच्या गोटात आल्याने थोरात गटाचे संख्याबळ १२ वर गेले. ताकद वाढली, तरीही अध्यक्षपदाचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले. शुक्रवारी सकाळी अध्यक्षपदासाठी गायकर, तर उपाध्यक्षपदासाठी रामदास वाघ यांचे नाव जाहीर करण्यात आले. भाजप विखे गटाच्या संचालकांची शुक्रवारी सकाळी शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. बँकेच्या पुढील कारभारात समन्वय राहावा, या उद्देशाने उमेदवार देण्याचे निश्चित करण्यात आले. पालकमंत्री राम शिंदे विखे यांनाही या निर्णयाची कल्पना देण्यात आली. त्यांच्याकडून संमती मिळाल्यानंतर गायकर वाघ यांच्या निवडीला समर्थन देण्यात आले. थोरात गट राष्ट्रवादीकडून भाजप विखे गटाला सुरुंग लागल्याने कर्डिले यांनी केलेला चमत्काराचा दावा भ्रमाचा भोपळा ठरला.

बिनविरोध निवड हा चमत्कार
बिनविरोध निवड हाच पदाधिकारी निवडीतील चमत्कार आहे. पुढील कामकाजात अडथळे नको, म्हणून फोडाफोडी केली नाही. शिवाजीकर्डिले, आमदार.

सोसायट्यांसाठी केडर व्हावे
सोसायट्यांच्या कर्मचारी सचिवांना बँकेच्या सेवेत सामावून घ्यावे. त्यासाठी स्वतंत्र केडर तयार करून त्यांना सामावून घेण्यात यावे. '' राधाकृष्णविखे, विरोधीपक्षनेते.

सामान्यांवर विश्वास
अजितपवार यांनी सामान्य माणसावर विश्वास टाकला. परंपरेचे पालन करण्यात गायकर यशस्वी ठरतील, याचा विश्वास आहे. मधुकरपिचड, माजीमंत्री.

सुरुवात चांगली झाली...
पदाधिकाऱ्यांच्याबिनविरोध निवडीने सुरुवात चांगली झाली आहे. सेवा सोसायट्या त्यांचे सचिव बळकट करण्याचा प्रयत्न आम्ही करू. बाळासाहेबथोरात, आमदार.

दोन्ही पदे उत्तरेला
जिल्हाबँकेच्या सत्ताकारणात जिल्ह्याच्या दक्षिण उत्तर भागाचा समतोल साधण्याचा प्रयत्न होत असे. मात्र, यावेळी अध्यक्ष उपाध्यक्ष ही दोन्ही पदे उत्तरेच्या पदरात टाकण्यात आली आहेत. सिताराम गायकर अकोले सेवा सोसायटी मतदारसंघातून, तर रामदास वाघ संगमनेर सेवा सोसायटी मतदारसंघातून निवडून आले आहेत. थोरात गटाकडून उपाध्यक्षपदासाठी दक्षिणेतील उमेदवार पुढे करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दक्षिणेच्या वाट्याला एकही पद आले नाही.

राजळेंची भूमिका अस्पष्टच
पदाधिकारीनिवडीसाठीची सभा आटोपत आल्यानंतर पाथर्डी सेवा सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले माजी आमदार राजीव राजळे सभास्थानी पोहोचले. ते सध्या भाजपमध्ये असले, तरी जिल्हा बँकेसाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा आदेश मानणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. अध्यक्ष, उपाध्यक्षांची बिनविरोध निवड ते सभेच्या शेवटी आल्याने त्यांची भूमिका शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहिली. हजेरी लावून त्यांनी तातडीने सभेतून काढता पाय घेतला.

अध्यक्षांनीच सोडली खुर्ची
जिल्हाबँकेच्या पदाधिकारी निवडीनंतर संचालकांकडून नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचे अभिनंदन सुरू असताना राधाकृष्ण विखे सभागृहात आले. ऐनवेळी त्यांना खुर्ची देण्यासाठी इतरांची लगबग उडाली. थोरात यांच्या शेजारी बसलेले नवनिर्वाचित अध्यक्ष गायकर यांनी बाजूला होत विखे यांच्यासाठी खुर्ची रिकामी करून दिली. शेजारी असलेले आमदार डॉ. सुधीर तांबे संचालक बिपीन कोल्हे यांनी बाजूला होत गायकर यांच्यासाठी खुर्चीची व्यवस्था केली.
खुर्चीसाठी सर्व काही.... जिल्हा बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर नेत्यांची संख्या वाढल्याने बसण्यासाठी खुर्च्या कमी पडल्या. खुर्ची नसल्याने आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार मधुकर पिचड यांच्या डोक्यावरून खुर्ची देण्यात आली. छाया: कल्पक हतवळणे
बातम्या आणखी आहेत...