नगर - पाऊस लांबल्याने जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गुरुवार अखेरपर्यंत जिल्ह्यातील लाख २० हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. त्यातच शासनाने दुष्काळी उपाययोजनांना दिलेली मुदतवाढ शुक्रवारी (३१ जुलै) संपत असल्याने सहा लाख नागरिकांच्या पाण्याचे भवितव्य आता टांगणीवर आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या दुष्काळी उपाययोजनांच्या मुदतवाढीवर चर्चा होणार अाहे. त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार असल्याचे समजते.
कमी पावसामुळे जानेवारीपासून जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने टँकरला मागणी वाढली होती. एप्रिल महिन्यात टँकरची संख्या ३०० वर गेली होती. मे महिन्यात ही संख्या ३८० वर गेली होती. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्याने टँकरची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. मे महिन्यात जिल्ह्यात लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. जुलै महिना पावसाचा असतो. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून पाऊस लांबल्याने टँकरच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दहा दिवसांत १५ टँकर वाढले आहेत. शुक्रवार अखेरपर्यंत २५८ गावे हजार १८४ वाड्या-वस्त्यांना ३५२ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता.
जिल्ह्यातील लाख २० हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.अकोले, श्रीरामपूर राहुरी तालुक्यात अद्याप टँकर सुरू नाहीत. पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक ७५ पाणी टँकर सुरू आहेत. त्याखालोखाल पारनेर तालुक्यात ६६ कर्जत तालुक्यात ४६ पाणी टँकर सुरू आहेत. जूनला दुष्काळी उपाययोजनांची मुदत संपली होती. याबाबत निर्णय घेण्यास विलंब लागल्याने दोन दिवस टँकर बंद करण्यात आले होते. त्यानंतर शासनाने दुष्काळी उपाययोजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ शुक्रवारी (३१ जुलै) संपणार आहे. मुदतवाढ संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाही शासनाकडून अद्याप याबाबत उपाययोजनांच्या मुदतवाढीबाबत कुठला निर्णय झाल्याने सहा लाख २० हजार नागरिकांच्या पाण्याचे भवितव्य टांगणीवर पडले आहे. उपाययोजनांबाबतचा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी निर्णय झाल्यास शनिवारी रविवारी शासकीय सुटी आहे. त्यामुळे सोमवारी याबाबत निर्णय होणार आहे. मात्र, तोपर्यंत आदेश आल्यास जिल्हा प्रशासनाला ३५२ पाणी टँकर बंद करावे लागणार आहेत. टँकर बंद झाल्यास लाखो नागरिकांना पाण्यासाठी पुन्हा भटकंती करावी लागणार आहे.
टँकरची संख्या
संगमनेर२५
नेवासे १४
कोपरगाव
नगर २९
पाथर्डी ७५
पारनेर ६६
शेवगाव ४०
कर्जत ४६
जामखेड २८
श्रीगोंदे १५
मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवला
सध्या सुरू असलेल्या विविध दुष्काळी उपाययोजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. शुक्रवारी या उपाययोजनांची मुदत संपणार आहे. उपाययोजनांना मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठवला आहे. मात्र, त्यावर अजून निर्णय झालेला नाही. शुक्रवारपर्यंत मुदतवाढ मिळाल्यास जिल्ह्यातील पाणी टँकर बंद करण्यात येतील.'' डॉ.वीरेंद्र बडगे, टंचाई विभागप्रमुख, नगर.