आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Six People Arrested In Chass Robbery Case In Nagar

चास शिवारातील दरोड्याच्या गुन्ह्यातील सहा जणांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर-पुणे महामार्गावर चास शिवारात मालट्रक चालकाला लुटून स्टीलसह मालट्रक चोरून नेणाऱ्या टोळीतील सहा जणांना पोलिसांनी अटक केली.

या गुन्ह्यातील आरोपींची संख्या सहा असल्यामुळे पोलिसांनी दाखल केलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचे रूपांतर दरोड्याच्या गुन्ह्यात झाले आहे. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मनेश हरिश्चंद्र बोरुडे (सारसनगर), नवनाथ सूर्यभान घोलप (निंबळक), वीरेंद्र विद्याधर भिंगारदिवे (माळीवाडा), शिरीष शांतवन विधाते (सारसनगर), गोरख उत्तम फुलारी (शिराढोण), राजू ढवळे (फुलसौंदर मळा) अशी पोलिस कोठडी मिळालेल्या आरोपींची नावे आहेत.
नगर तालुका पोलिसांनी गुरुवारी दुपारी आरोपींना अटक केली. यापूर्वी या गुन्ह्यात पारनेर तालुक्यातील तीन जणांना अटक केली होती. पण, त्यांचा या गुन्ह्यात सहभाग नसल्याचे निष्पन्न झाल्यामुळे नंतर त्यांना सोडून देण्यात आले. या गुन्ह्याचा पुढील तपास नगर तालुका पोलिस करीत आहेत.