आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Six Teacher Custody At Ahmednagar For Bogus Handicap Certificate Issue

अहमदनगर: सहा शिक्षकांच्या कोठडीत वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र देऊन जिल्हा परिषदेची फसवणूक केल्याप्रकरणी सहा शिक्षकांच्या पोलिस कोठडीत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. डी. इंदलकर यांनी बुधवारी वाढ केली. संगीता टोणपे, सरला गावडे, सुवर्णा मोहळकर, वैशाली लोंढे, रोहिणी ढोमे व गोरख धस अशी या शिक्षकांची नावे आहेत. हे शिक्षक 14 जानेवारीला न्यायालयासमोर हजर झाले होते. न्यायाधीश इंदलकर यांनी या शिक्षकांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडी दिली. कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. गणपत लगड व ज्ञानेश्वर पोकळे या मध्यस्थांकडून शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र मिळवल्याची माहिती दिली. संबंधितांचा शोध घ्यावयाचा असून तपासासाठी या शिक्षकांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकार पक्षाच्या वतीने करण्यात आली. न्यायाधीश इंदलकर यांनी या शिक्षकांच्या कोठडीत 18 जानेवारीपर्यंत वाढ केली.