आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जायकवाडीकडे सहा हजार क्युसेक्स विसर्ग, पावसाचा जोर वाढला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले / राहुरी- पावसाचा जोर वाढल्याने भंडारदरा, निळवंडेतून 10 ऑगस्टपासून सुरू असलेले पाणी सोमवारी जायकवाडी धरणात पोहोचले. भंडारदरातून अतिरिक्त पाणी 3,268 क्युसेक्सने निळवंडे धरणात जात आहे, तर निळवंडेतून 6,254 क्युसेक्सने पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावत आहे. सव्वीस हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणात सध्या 19 हजार 816 दशलक्ष घनफूट (76 टक्के) पाणीसाठा आहे. धरणात पाण्याची 2247 क्युसेक्सने आवक सुरू आहे.

11 हजार 39 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदरा धरणात मंगळवारी 10,599 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. निळवंडे धरणात 5212 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. धरणाच्या सांडव्यावरून 6254 क्युसेक्सने प्रवरा नदीत विसर्ग सुरू आहे. 1 जून ते 12 ऑगस्टपर्यंत झालेल्या पावसाने 4 हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला.

मुळातून शेतीसाठी आवर्तन सुरू
धरणाच्या लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरण यावर्षी पूर्ण भरण्याची शक्यता आहे. राहुरी तालुक्यात जेमतेम पावसाने सर्वांचे लक्ष धरणाच्या पाण्याकडे लागले आहे. धरणात पाणी आहे, पण तालुक्यात पाऊस नाही, अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे मुळाच्या उजव्या कालव्यातून 1363 क्युसेक्स, तर डाव्यातून 300 क्युसेक्स पाणी शेती सिंचनासाठी सोडण्यात आले आहे.