आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Six Year Boy Death For Container Accident At Ahmednagar

कंटेनरची धडक बसून सहा वर्षांच्या बालकाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- भरधाव जाणार्‍या कंटेनरची पाठीमागून जोराची धडक बसून सहा वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास नगर-औरंगाबाद महामार्गावर तवलेनगर परिसरात घडली. हर्षद भारत तनपुरे असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. हर्षदची आई रोहिणी यांनी गावाला जाताना हर्षद व मुलगी दीदी (वय 3) या दोघांना तवलेनगर परिसरात राहणारी मैत्रीण सुमन सेवक जाधव (35) यांच्याकडे ठेवले होते. दुपारच्या वेळी हर्षद घराबाहेर खेळायला गेला. नगर-औरंगाबाद महामार्गाच्या कडेला खेळत असताना नगरहून औरंगाबादकडे जाणार्‍या कंटेनरची (एमएच 6 एसी 7333) त्याला पाठीमागून जोराची धडक बसली. हर्षदच्या डोक्याला मार लागून जागीच त्याचा मृत्यू झाला. काही प्रत्यक्षदर्शींनी पाठलाग करुन कंटेनर अडवला. अपघाताची माहिती समजताच तोफखाना पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुलकुमार पाटील घटनास्थळी आले. कंटेनरचालक सुरेंद्रकुमार सोहनलाल यादव (देवरी, ता. कुंडा, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली. सुमन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन त्याच्याविरुद्ध अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस तपास सुरू आहे.