आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यसनांमुळे दरवर्षी 9 लाख लोकांचा मृत्यू, संभाजी सतरकर यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- भारतात दरवर्षी ८ ते ९ लाख लोकांचा तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्याने कर्करोगाने मृत्यू होतो. व्यसनांमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण पाहता अतिरेकी हल्ल्यापेक्षा जास्त घातक आहे, असे प्रतिपादन बीएसएनएलचे वरिष्ठ उपमंडल अभियंता संभाजी सतरकर यांनी केले.
नेवासे तालुक्यातील गेवराई येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये "व्यसनमुक्ती' या विषयावर आयोजित व्याख्यानात सतरकर बोलत होते. या प्रसंगी प्रभारी मुख्याध्यापक प्रकाश उंडे, अर्जुन हरिश्चंद्रे, चंदा जगताप, सुबान शेख, मेहबूब शेख, शुभांगी गाडेकर, रागिणी बऱ्हाटे, छाया कर्डिले, भारती वाकचौरे, राजेंद्र जऱ्हाड, अमोल गोरे, जयवंत लोखंडे, अनिल शिंदे, रेखा ठाणगे, सुनील वांढेकर, दादाभाई वांढेकर यांच्यासह सुमारे ४५० विद्यार्थी उपस्थित होते.
सतरकर म्हणाले, महाराष्ट्रात २ कोटी ५९ लाख लोक व्यसनाधीन आहेत. पैकी पुरुष ४२.२ टक्के, महिला १८.९ टक्के, मुले १२.३ टक्के, तर ११.३ टक्के मुली व्यसन करतात. गुजरातमध्ये दारू व तंबाखूवर बंदी आहे, तर राजस्थान सरकार ६५ टक्के कर घेते. त्यामुळे या राज्यात लोक जास्त तंबाखू खात नाही.
सिगारेटवर बंदीसाठी जनहित याचिका
तंबाखू व सिगारेटवर बंदी आणावी यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयात सतरकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. तंबाखू व सिगारेटवर बंदी आणावी किंवा १०० टक्के कर लावावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेत कायदा करावा यासाठी सतरकर यांनी पत्र लिहिले आहे.