आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress NCP Pushed Maharashtra Into "bad" Condition Says Smriti Irani In Nagar

महाराष्ट्राचा वनवास १९ला संपणार : स्मृती इराणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे - महाराष्ट्राचा पंधरा वर्षांचा वनवास येत्या १९ तारखेला संपून महाराष्ट्रात दिवाळी साजरी होऊन लोकांच्या परिवर्तनाची लढाई संपेल, असे प्रतिपादन केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांनी केले.

नेवासे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचारासाठी शहरात झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा सरचिटणीस अनिल ताके होते. व्यासपीठावर सचिन देसरडा, नवनीत सुरपुरिया, स्वाभिमानी संघटनेचे अंबादास कोरडे आदी उपस्थित होते. ज्ञानेश्वरांच्या पसायदानात दुष्टांचा दुष्टपणा जावो, असे मागणे आहे. त्याप्रमाणे दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी सोनईमध्ये दहशत असतानाही भाजपने रॅली काढली. याबद्दल इराणी यांनी भाजप कार्यकर्त्यांचे कौतुक केले. ज्याप्रमाणे रावणाची सोन्याची लंका जळाली, त्याप्रमाणे सोन्याची सोनईदेखील भाजप लाटेत जळून जाईल, अशी टीका त्यांनी केली.

नेवाशा प्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्र पंधरा वर्षे वनवासात आहे. आघाडी शासनाने कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले आहेत. राज्यावर दहशतवादी हल्ला झाला. शेतकऱ्यांवर लाठी हल्ला झाला, महिला पोलिसांवर अत्याचार झाले, तरीही राष्ट्रवादीचे नेते शांत राहिले, असे त्या म्हणाल्या. या सभेत काँग्रेसचे नितीन दिनकर, जनार्दन जाधव, भाऊसाहेब वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

"महाराष्ट्राच्या सन्मानासाठी भाजपचे सरकार निवडून आणा'
महाराष्ट्रही शूरांची, वीरांची भूमी आहे. मात्र, हाच महाराष्ट्र कर्जबाजारी झाला आहे. गेल्या १५ वर्षांत येथील विकास थांबला आहे. याला काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार जबाबदार आहे. महाराष्ट्राच्या सन्मानासाठी केंद्राप्रमाणेच राज्यात भाजपचे सरकार निवडून आणा, असे आवाहन स्मृती इराणी यांनी मिरजगाव (कर्जत) येथे केले. या वेळी खासदार दिलीप गांधी, उमेदवार राम शिंदे, भीमराव धोंडे, नामदेव राऊत, नानासाहेब निकत, अशोक खेडकर, अॅड. बापू चव्हाण उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे नानासाहेब निकत, अॅड. शिवाजीराव अनभुले, सुनील शेलार, अशोक जायभाय, बबनभाऊ नेवसे, संजय पवार, धनराज कोपनर, सतीश पाटील, अंकुश यादव, राजेंद्र देशमुख, मंगेश जगताप, राहुल जगताप, बापूराव शेळके, अतुल जाधव, बबनराव कोपनर, अल्ताफ पठाण, शंकर कांबळे, गणेश परदेशी आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.

नेवासे मतदारसंघातील भाजप उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचारार्थ नेवासे येथे अायोजित सभेत बोलताना केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी.