आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंचित बालकांपर्यंत पोहोचवा प्रकाशाचे दान, स्नेहालय परिवारातर्फे मदत करण्‍याचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- दीपोत्सवात आपण असीम आनंदाची अनुभूती घेतो. फटाके, खाऊ, अत्तर, नवे कपडे अशी रेलचेल असते. पण याचवेळी समाजातील अनेक बंधू-भगिनी, खास करून बालके या आनंदापासून वंचित असतात. त्यात विविध संस्थांमध्ये राहणारी अनाथ, निराधार बालके, एड्सग्रस्त, मतिमंद मूकबधिर, अंध, अपंग आणि इतर व्याधीग्रस्त बालकांचा समावेश असतो. आपल्या आनंदात आपण त्यांनाही सहभागी करून घेतले, तर आपल्या दीपोत्सवाचा आनंद शतगुणीत होईल, असे आवाहन स्नेहालय परिवारातर्फे करण्यात आले आहे.
कपड्याचा अ अंगाचा साबण, १०० ग्रॅम टूथपेस्ट, सॉफ्ट टूथब्रश, तेलाची बाटली, उटणे असा संच वंचित बालकांसाठी देणगी म्हणून दिल्यास वंचित बालकांची दिवाळी आनंदाची होऊ शकेल. या उपक्रमातून नगर शहर आणि जिल्ह्यातील विविध संस्था, तसेच झोपडपट्ट्यांतील 20 हजार वंचित बालकांपर्यंत प्रकाशाचे दान पोहोचवण्याचा संकल्प आहे. देणगीदारांना एक प्रेरक संदेश आणि कृतज्ञता पत्र दिले जाईल. तसेच मंडळांना प्रकाशाचे दान उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. 25 ऑक्टोबरपर्यंत हा उपक्रम चालणार आहे. मदत स्वीकारण्याची व्यवस्था स्नेहांकूर केंद्र, लेंडकर मळा, बालिकाश्रम रस्ता (9850128678) येथे करण्यात आली आहे.