आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रकृतीत सुधारणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भोवळ अाल्यामुळे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. वाढत्या उष्णतेमुळे अण्णांच्या शरीरातील पाणी कमी झाले होते. तसेच अशक्तपणाचा त्रास जाणवून त्यांना भोवळ आली होती. त्यामुळे अण्णांना ३१ मार्चला नगरच्या नोबल रुग्णालयात दाखल केले होते.
रविवारी मध्यरात्री त्यांना अस्वस्थ वाटल्याने पुन्हा अतिदक्षता विभागात हलवले होते. पण, काही मिनिटांतच त्यांची प्रकृती स्थिर झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. मार्चमध्ये अण्णा तामिळनाडू दौऱ्यावर होते. कोइमतूर येथे नद्या, नाल्यांची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. अण्णांनी या मोहिमेत हजेरी लावली होती. ते काेइमतूरहून हैदराबादला आले. तेथून मोटारीने लातूरला गेले. लातूरला एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर ते राळेगणला परतले. तेव्हापासूनच त्यांना अशक्तपणा जाणवत होता.वैद्यकीय तपासणीसाठी अण्णांना "नोबल'मध्ये आणले.डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. सुनील बंदिष्टी, डॉ. मनोज मगर यांनी तपासण्या केल्या. सर्व रिपोर्ट नॉर्मल आले. औरंगाबादचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे, पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी अण्णांना भेटून प्रकृतीची विचारपूस केली. रविवारी ते डॉ. विश्वंभर चौधरी, डॉ. कल्याण गंगवाल, आमदार संग्राम जगताप यांनीही अण्णांची भेट घेतली. अण्णांचे विश्वासू कार्यकर्ते अॅड. श्याम असावा, संजय पठाडे हे त्यांच्यासोबत आहेत.