आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Media Play Into The Hands Of A New Generation Actress Alka Kubala

नवी पिढी सोशल मीडियाच्या आहारी -अभिनेत्री अलका कुबल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-नव्या समाजरचनेत सामाजिक संदर्भ वेगाने बदलत असून नवी पिढी सोशल मीडियाच्या आहारी जात आहे. चॅटिंग सारख्या माध्यमातून जुळणारी नाती चिरकाल टिकणारी नसतात. पार्श्वभूमी माहिती नसताना उतावीळपणाने तरुणींनी जीवनात अनर्थ ओढावून घेऊ नये, असे आवाहन अभिनेत्री अलका कुबल यांनी गुरुवारी केले.

आमदार चंद्रशेखर घुले मित्र मंडळातर्फे पाथर्डीतील बाजारतळावर पंचवार्षिक हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रार्जशी चंद्रशेखर घुले यांच्या पुढाकाराने महिला मेळावा, हळदी-कुंकू समारंभ कुबल यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सर्व महिलांना भेटवस्तू व वाण स्वरूपात झाडाची रोपे देण्यात आली. संस्कार, संस्कृती व निती मूल्यांच्या मुद्दय़ावरून कुटुंबात रंगणारे वाद-विवाद टाळायचे असतील, तर नव्या बदलांना हळूवारपणे स्वीकारायला शिकले पाहिजे. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रत्येक स्त्रीने पुढे यावे. शारीरिक सक्षमता, मानसिक प्रगल्भता वाढवत महिलांनी उंबरठा ओलांडून स्वत:ची ओळख द्यायला सिद्ध व्हा. मालिका व चित्रपटच्या फसव्या जगापासून सावरा, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक ज्योती बंडू बोरुडे, यांनी, तर सूत्रसंचालन भारती असलकर यांनी केले. आभार स्मिता जाजू यांनी मानले.

..तर जिजाऊ व्हावे

अनैतिक संबंधांना प्रतिष्ठा देऊ पाहणार्‍या मालिकांमध्ये मराठी महिलांनी गुरफटू नये. मालिकांमधील उपदेशाने कुटुंब व्यवस्था मजबूत होत नाही, तर त्यासाठी कुटुंबाचे संस्कार मजबूत असायला हवेत. मुलाने शिवबा व्हावे असे वाटत असेल, तर आईने जिजाऊ व्हावे, असे कुबल म्हणाल्या.