आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेरपर्यंत रंगला होता सोशल मीडियातून प्रचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मतदानाच्या दिवशीही प्रमुख उमेदवारांमध्ये प्रचारयुद्ध रंगले होते. जाहीर प्रचार मंगळवारी (15 एप्रिल) संपला, तरी सोशल मीडियावर या उमेदवारांचे कार्यकर्ते प्रचाराची धुरा सांभाळत होते. कोणाची तक्रार नसल्याने कारवाईचा प्रo्नच उद्भवत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
जाहीर प्रचार संपल्यानंतर छुप्या प्रचाराला चांगलाच जोर चढला. नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार दिलीप गांधी व राष्ट्रवादीचे राजीव राजळे यांच्यात लढत आहे. सोशल मीडियातून या दोन्ही उमेदवारांच्या सर्मथकांनी परस्परांवर चिखलफेक करताना विविध फंडे वापरले. दोन्ही उमेदवारांची शैक्षणिक तुलना करून उच्चशिक्षित उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन राजळे सर्मथकांनी केले. त्याला प्रत्युत्तर देताना गांधी सर्मथकांनी मोदी लाटेचा आधार घेतला. मोदी यांचा फोटो टाकत त्यांच्या नावे राजळे यांना मतदान करण्याचे आवाहन राजळे सर्मथकांनी केले. राजळे यांचा प्रचार करताना विविध युक्त्यांचा वापर फेसबुकवर करण्यात आला. हिंदी चित्रपटातील पोस्टरचा वापर करून गमतीशीर वक्तव्ये टाकण्यात आली.
गांधी सर्मथकांनी मोदी लाटेचा पुरेपूर उपयोग करत राजळे यांच्या प्रचाराला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न फेसबुकवर केला. मतदारसंघात यापूर्वी केलेल्या कामांचा उपयोग करण्याऐवजी मोदी क्रेझचा वापर केला गेला. व्हॉटस् अँपवरही दोन्ही उमेदवारांचे सर्मथक गुरुवारी सकाळपासूनच आपापल्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करत होते.
जाहीर प्रचार समाप्त झाल्यानंतर छुप्या प्रचाराला गती आली होती. मात्र सोशल मीडियावर कोणतेही बंधन नव्हते. सोशल मीडियावरील प्रचारासंदर्भात कोणतीही तक्रार आलेली नाही, त्यामुळे चौकशी किंवा कारवाईचा प्रश्‍न नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. सोशल मीडियावरून केल्या गेलेल्या प्रचाराचा कोणत्याही उमेदवाराने त्यांच्या प्रचार खर्चात समावेश केलेला नाही.