आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social News In Marathi, Mother's Must Should Work As Jijau, Smita Patil, Divya Marathi

..तरच शिवराज्य अवतरेल : डॉ. स्मिता देशमुख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘शिवराज्य’च्या शिवजयंती महोत्सवाची सांगता

राजमाता जिजाऊ व शहाजीराजे यांनी आपली स्वराज्याची संकल्पना शिवाजी महाराजांच्या माध्यमातून पूर्णत्वास नेली. म्हणूनच शिवाजी महाराज हे रयतेचे राजे झाले. घराघरात जिजाऊ तयार झाल्या, तर आजही शिवराज्य नक्कीच अवतरेल, असे प्रतिपादन मराठी चित्रपटांत जिजाऊंची भूमिका साकारणार्‍या अभिनेत्री डॉ. स्मिता देशमुख यांनी केले.

शिवराज्य पक्षातर्फे भिस्तबाग चौकामध्ये आयोजित शिवजयंती महोत्सवातील व्याख्यानमालेचा समारोप बुधवारी रात्री डॉ. देशमुख यांच्या ‘जिजाऊंचे मातृत्व व शिवरायांचे कर्तृत्व’ या विषयावरील व्याख्यानाने झाला. त्या म्हणाल्या, जिजाऊंनी शिवरायांना आदर्श राजा बनवण्यासाठी सर्वांगीण संस्कार केले. शहाजीराजांचेही त्यांना पाठबळ मिळाले. त्या दोघांमुळेच शिवाजी महाराज घडले. आज मात्र राज्यकर्ते रयतेऐवजी स्वत:चे कल्याण करण्यावरच भर देत आहेत. ही जिजाऊंच्या विचारांप्रती बेईमानी आहे.
आता पुन्हा एकदा घराघरांत जिजाऊ तयार झाल्या पाहिजे. महिलांनी जिजाऊंची प्रेरणा घेऊन आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजेत, जेणेकरून रयतेच्या कल्याणाला प्राधान्य देणारे चांगले नेतृत्व उदयाला येईल. तसे झाले तरच खर्‍या अर्थाने शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले सुराज्य अवतरेल, असे डॉ. देशमुख म्हणाल्या.
या व्याख्यानाला जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे रामनाथ वाघ, जालिंदर बोरुडे, सोपान मुळे, प्रकाश कराळे, वसंत कार्ले, अशोक कुटे, रार्जशी शितोळे, पद्मा गांगर्डे उपस्थित होते. या सोहळ्याच्या यशस्विततेसाठी ‘शिवराज्य’चे प्रदेश उपाध्यक्ष संजीव भोर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण गवळी, युवराज साबळे, संदीप संसारे, असिफ शेख, नाना आरडे, अविनाश गुंजाळ, राजू गांगुर्डे आदी प्रयत्नशील होते. सूत्रसंचालन तुकोबाराय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष सीताराम काकडे यांनी केले.