आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social News In Marathi She Maried With A Handicapped Boy, Divya Marathi

सुदृढ युवतींनी केला अपंग तरुणांशी विवाह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्न करताना आपला जोडीदार धडधाकट, सदृढ असावा असा प्रत्येकाचाच आग्रह असतो; पण नगर जिल्ह्यातील सुमारे 75 सुदृढ युवतींनी अपंग जोडीदार स्वीकारून आदर्श घालून दिला आहे.
वर किंवा वधू निवडताना परस्परांच्या कौटुंबिक परिस्थितीचा आढावा ज्येष्ठांकडून घेतला जातो. वधू परीक्षेच्या वेळी काही व्यंग नाही ना, याची खात्री करून घेतली जाते. व्यंग असल्यास ते लपवण्याचा प्रयत्न होतो; पण व्यंग असल्याचे माहीत असूनही आता युवती अशा युवकांची जोडीदार म्हणून निवड करू लागल्या आहेत. अपंग व्यक्तीने सुदृढ व्यक्तीशी विवाह केल्यास अशा जोडप्याला 10 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या अखत्यारीतील अपंग कल्याण कक्षामार्फत राबवली जाते. या योजनेचा आढावा घेताना सर्वाधिक 75 सुदृढ युवतींनी अपंग पुरुषांशी विवाह केल्याचे समोर आले. आंतरजातीय विवाह केल्यास पन्नास हजारांपर्यंत अनुदान दिले जाते.
अपंगांसाठी निधी तुटपुंजा
जिल्हा परिषदेमार्फत 2012-2013 मध्ये अवघे तीन लाखांचे अनुदान प्राप्त झाले होते. 2013-2014 या वर्षासाठी दहा लाखांचा निधी उपलब्ध झाला. हा निधी तुटपुंजा असून यात आणखी वाढ करण्याची मागणी होत आहे.
सकारात्मक । जिल्ह्यातील 73 जोडप्यांना दिले प्रोत्साहनपर अनुदान
विवाह संख्या
75
महिला
27
पुरुष
10 हजार
अनुदान
30
प्रलंबित प्रस्ताव
सरकारने प्रोत्साहनपर अनुदानात वाढ करण्याची गरज
4 माझा एक भाऊदेखील अपंग आहे. त्याची पत्नी सुदृढ आहे. त्यामुळे मला विवाह करताना अपंग जोडीदार निवडल्याचा विशेष आनंद आहे. दैनंदिन जीवनात कोणत्याही अडचणी येत नाहीत. आम्ही सुखाने संसार करत आहोत. सरकारने अशा विवाहांसाठी प्रोत्साहनपर अनुदानात वाढ करावी, एवढीच माफक अपेक्षा आहे.’’ माधव माने, पती.
कौतुक करावे तेवढे थोडे
4मी अपंग असून माझी पत्नी सुदृढ आहे. दोघांचा एकमेकांशी सुसंवाद असल्याने आम्ही आनंदी सहजीवन जगत आहोत. जिल्हा परिषद आमच्यासारख्या जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान देते; पण शहरी भागातील जोडपी महापालिकेच्या उदासीनतेमुळे अनुदानापासून वंचित राहतात.’’ बाबासाहेब महापुरे, नगर.
त्या वेळी लोक हसायचे..
4 मी पन्नास टक्के अपंग असल्याने गुडघ्यावर हात ठेवून चालायचे. त्या वेळी लोकांना वाटायचे हिचे लग्नच होणार नाही; पण मी जिद्दीने एमए, बीएड केले. त्यानंतर मला माधव यांच्या रूपाने सुदृढ जोडीदार मिळाला. आम्ही संसारात रमलो असून दोघेही आनंदी आहोत. आम्हाला एक मुलगा आहे.’’ रोहिणी माने, संगमनेर