आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social News In Marathi, Teachers Again Created Issue, Divya Marathi

शिक्षकांच्या परीक्षा पर्यवेक्षणावरून नवा वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहावी व बारावीच्या परीक्षेत पर्यवेक्षण करणार्‍या शिक्षकांना दिल्या जाणार्‍या मानधनावरून नवा वाद निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी 25 रुपये मानधन होते, ते यावर्षी 20 रुपये करण्यात आल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे पर्यवेक्षण मानधन प्रतिपेपरसाठी 50 रुपये करावी, अशी शिक्षकांची मागणी आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षेच्या कालावधीत पर्यवेक्षणासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात येते. प्रतिपेपरसाठी मागील वर्षी 25 रुपये मानधन शुल्क होते. ते आता पुन्हा 20 रुपये करण्यात आहे. तसेच उत्तरपत्रिका तपासणीचे दर कमी असल्याने शिक्षकांमधून नाराजीचा सूर निघत आहे. मानधनात वाढ करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी आमदार कपिल पाटील यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडे मागण्यांचे निवेदन पाठवले आहे. मानधन 50 रुपये करणे, उत्तरपत्रिका तपासणीसाठी सरसकट 10 रुपये, 53 वर्षांपुढील महिला शिक्षक, दुर्धर आजाराने ग्रस्त शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीचे काम देऊ नये, शाळेतील 50 टक्के शिक्षकांवर उत्तरपत्रिका तपासणीचे काम सोपवावे आदी विविध मागण्यांचा आमदार पाटील यांना दिलेल्या निवेदनात समावेश आहे.
‘त्यांच्या’वर गुन्हे नोंदवा
4दहावी व बारावी परीक्षेच्या कालावधीत कॉपी करण्यास विरोध करणार्‍या महिला पर्यवेक्षकाला काही विद्यार्थ्यांकडून मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावे व परीक्षा पर्यवेक्षणाचे मानधन 50 रुपये करावे, अशी मागणी जिल्हा महिला शिक्षक भारती संघटनेने शिक्षण मंडळाकडे केली आहे.’’ आशा मगर, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना.