आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफवा पसरवणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्या : जाधव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले- गणेशोत्सव बकरी ईद शांततेत कायद्याच्या चौकटीत राहून साजरे करावेत. या काळात काही समाजविघातक शक्ती अफवा पसरवण्याचे काम करताना दिसल्या, तर पोलिसांशी संपर्क साधावा. अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियाचा वापर चुकीचा होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी येथे बोलताना केले.

सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत जाधव यांनी प्रशासन, शांतता कमिटी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, गणेश मंडळांचे पदाधिकारी मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी तहसीलदार मनोज देशमुख, पोलिस निरीक्षक नारायण वाखारे, उपनिरीक्षक नितीन बेंद्रे, अॅड. वसंतराव मनकर, सीताराम भांगरे, मच्छिंद्र धुमाळ, उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी, सचिन शेटे, निखिल जगताप, राजेंद्र आंबरे, अमोल वैद्य, राम भांगरे, दत्तात्रेय शेणकर, अयाज शेख, शाहीद फारुकी, डॉ. असिफ तांबोळी, अन्सार पठाण, मन्सूर सय्यद, शाहनवाज शेख, अरिफ शेख, अर्शद तांबोळी आदी उपस्थित होते.

विसर्जनाच्या दिवशी आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. मुस्लिम बांधव विसर्जनाच्या दिवशी बकरी ईदची कुर्बानी देणार नाहीत, असा निर्णयही घेण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...