आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Social Worker Alka Mehta,latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अलका मेहता यांना अणुव्रत पुरस्कार जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जैन तेरापंथ चातुर्मासानिमित्त दिला जाणारा अणुव्रत सेवी श्राविका पुरस्कार मूळच्या नगरच्या असलेल्या अलका मेहता-सांखला यांना जाहीर झाला आहे.
गुरुदेव तुलसी यांनी अणुव्रत आंदोलन संपूर्ण देशात राबवले. त्यांच्या शताब्दी वर्षानिमित्त नवी दिल्ली येथे जैन तेरापंथ आचार्यश्री महाश्रमणजी यांचा चातुर्मास सुरू आहे. या चातुर्मासात समाजासाठी सतत कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येतो. अलका मेहता-सांखला यांनी देश-परदेशांत अणुव्रताचा प्रसार केला. त्यामुळे त्यांना हा सन्मान जाहीर झाला. त्या मूळच्या नगरच्या असून सध्या त्यांचे वास्तव्य अमेरिकेत आहे. सन २००४ मध्ये त्यांना अमेरिकेतील सीनसिनाटी येथे पर्युषण करण्याची संधी मिळाली. नंतर डेट्रॉईट, व्हर्जेनिया, ह्यूस्टन येथे त्यांनी अनेक कार्यक्रम केले. कविता, कथाकथन, संस्कार-संस्कृती दर्शन आदी कार्यक्रमही त्या करतात. २०११ मध्ये मेहता यांना इंटरनॅशनल जैन कॉन्फरन्समध्ये योगा शिकवण्याची संधी मिळाली. "आओ जीन सिखे' हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध असून त्याला डेट्रॉईटचे प्रायोजकत्व मिळाले आहे. मेहता यांना १९९९ मध्ये तेरापंथ महिला मंडळातर्फे प्रतिभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाजकार्य करण्याची प्रेरणा मला मातोश्री स्नेहप्रभा मेहता यांच्याकडून मिळाली, असे त्या सांगतात.
नैतिकता व चारित्र्य निर्माणाचे ध्येय
अणुव्रत हे नैतिकता व चारित्र्य निर्माण करण्याचे कार्य आहे. "सुधरे व्यक्ती, समाज व्यक्ती से राष्ट्र स्वयं सुधरेगा' असे गुरुदेव तुलसी यांनी सांगितले होते. त्यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. पंडित नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, मोरारजी देसाई, काकासाहेब कालेलकर यांच्यासारखे मान्यवरही अणुव्रतमुळे प्रभावीत झाले होते.