आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाद: खासदार गांधींचे विधान म्हणजे "लोका सांगे...', अॅड. आसावा यांची घणाघाती टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो दिलीप गांधी)
नगर- खासदार दिलीप गांधी यांनी अलीकडेच माहितीचा अधिकार कायद्याचा दुरुपयोग गैरवापर होत असल्याचे विधान केले होते. त्यांचे हे विधान म्हणजे "लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: मात्र कोरडे पाषाण' अशा स्वरूपाचे आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रयत्नांमुळे माहितीचा अधिकार जनतेला मिळाला. त्यामुळे या अधिकाराचा दुरुपयोग गैरवापर होत असला, तरी याबाबत बोलण्याचा अधिकार खासदार गांधी यांना नाही, अशी घणाघाती टीका भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे सामाजिक कार्यकर्ते अॅड. श्याम आसावा यांनी केली.
पत्रकात आसावा यांनी म्हटले आहे, गांधी यांनी अर्बन बँकेचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर काय दुरुपयोग गैरवापर केला याची जनतेला माहिती आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे भविष्यात सुरेश जैन यांच्यासारखे तुरुंगात बसण्याची वेळ गांधींवर किंवा त्यांच्यामुळे इतर संचालकांवर येऊ नये. तंबाखू सेवनाचे समर्थन करून संसदेने नेमलेल्या तंबाखूबाबत समितीच्या पदाचा गांधी यांनी दुरुपयोग गैरवापरच केला. या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्या मतदारसंघातील लोकांसुद्धा शरमेने मान खाली घालण्याची वेळ आणली.
खासदार गांधी यांनी लबाड लांडग्यांचे समर्थन करण्यापेक्षा हजारे यांनी वेळोवेळी मागणी केल्याप्रमाणे माहितीच्या अधिकाराचा मान राखावा. शासनाच्या सर्वच खात्यांची अधिकतम माहिती इंटरनेटवर, तसेच कार्यालयातील दर्शनीय भागात प्रसिद्ध करावी. प्रत्येक शासकीय कार्यालयात माहितीचा अधिकार कलम ची प्रभावी अंमलबजावणी करावी, तरच शासकीय कार्यालयात अर्ज करण्याची वेळ नागरिकांवर येणारच नाही. सर्वांचाच त्रास कमी होईल, असा उपदेशही अॅड. आसावा यांनी केला आहे.
आसावा यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी "दिव्य मराठी'ने गांधी यांच्याशी संपर्क साधला. पण, त्यांनी या विषयावर बोलण्याचे टाळले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, भविष्यात भानगडी बाहेर येतील...
बातम्या आणखी आहेत...