आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलेच्या माध्यमातून समाजसेवा करणारे 'झेंडा स्पेशालिस्ट'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: विविध झेंडे लीलया तयार करणारे गणेशराव निरगुडे.
संगमनेर - आर्थिक परिस्थिती साधारण असलेली व्यक्तीही कलेच्या माध्यमातून समाजसेवा करू शकते, याचे उत्तम उदाहरण झेंडा स्पेशालिस्ट गणेशराव शंकरराव निरगुडे. अल्प किमतीत सुशोभित अर्ध्या मीटरपासून अकरा मीटरपर्यंतचे विविध झेंडे ते करतात. त्यांची ही झेंड्याच्या माध्यमातील सेवा २५ वर्षांपासून सुरू आहे.

खासगी नोकरी आणि रात्री ते वाजेपर्यंत झेंडे शिवण्याचे काम असा निरगुडे यांचा दिनक्रम. शिवाय कधीही प्रभातफेरी चुकली नाही हे देखील त्यांचे विशेष. त्यांना पत्नी प्रिया देखील साथ देतात. आर्थिक परिस्थिती साधारण असली, तरी मुलांना उच्च शिक्षणापासून त्यांनी वंचित ठेवले नाही. अर्ध्या मिटरचा झेंडा कापड, झालर त्यावरील कलाकुसरीसह ते ५१ रुपयांत शिवून देतात, तर ११ मिटरचा झेंडा त्याला झालर, झेंड्यावर स्वस्तिक, ओम, गोंडे यासह ८५१ रुपयांत शिवून देतात. अतिशय माफक दर, उत्कृष्ट काम यामुळे त्यांना झेंड्याचे काम नेहमीच मिळते. यामुळे अकोले, संगमनेरसह सिन्नर, वेरूळ, शिंगणापूर आदी ठिकाणच्या ऑर्डर देखील त्यांना मिळतात. एकीकडे महागाई गगनाला गवसणी घालत असतानाही ते झेंड्याच्या अल्प नफ्यात समाधानी आहे. वडिलांनी शिकवलेली कला जोपासणे हा माझा उद्देश अाहे. यातून मोठी धनप्राप्ती झाली पाहिजे असे मी कधीही पाहत नाही. तसेच पैशाच्या कारणावरून कोणाचाही काम अडवत नाही, असे ते म्हणतात. त्यांच्या या कलेचे कौतुक आमदार डॉ. सुधीर तांबे, कानडे महाराज, गोवत्स राधाकृष्ण महाराज, शांतीगिरी महाराज आदींनी केले. तीन मुलांपैकी एका मुलाने तरी हाच वारसा पुढे सुरू ठेवावा, अशी माझी इच्छा असल्याचे निरगुडे सांगतात.
गणेशराव निरगुडे यांचे कार्य कौतुकास्पद...
गणेशराव यांचे वडील शंकरराव म्हणजे एक भोळेभाबडे व्यक्तिमत्त्व. नगरपालिकेच्या कोप-यावर रस्त्यावर बसून खणाची चोळी शिवायचे काम करायचे. कधीही पैशासाठी कोणाचीही अडवणूक केली नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांचाच वारसा गणेशराव चालवत आहेत. झेंड्याच्या माध्यमातील त्यांची समाजसेवा कौतुकास्पद आहे.'' डी.बी. राठी, अध्यक्ष इतिहास संशोधन मंडळ.

झेंड्याद्वारे घडते समाजसेवा...
मी१९९० पासून झेंडा शिवण्याचे काम करतो. केशवतीर्थावरील मारुती मंदिराचा पहिला झेंडा शिवला आहे. त्यानंतर अनेक मंदिरांचे, शासकीय कार्यालयांचे, राजकीय पक्षांचे, विविध सणासाठी लागणारे झेंडे शिवण्याचे काम करत आहे. यातून एकप्रकारे सर्वधर्मीयांची समाजसेवाच घडत आहे. या कामातून आपणास आनंद मिळतो.'' गणेशरावनिरगुडे, झेंडा स्पेशालिस्ट कारागीर, संगमनेर.