आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोसायटी हायस्कूल आणि अमरापूरकरांचे अतूट नाते, छाया फिरोदिया यांची श्रद्धांजली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे शालेय शिक्षण सोसायटी हायस्कूलमध्ये झाले. त्यांच्या अभिनयाचा पाया याच प्रशालेत रचला गेला आणि त्याला झळाळीही इथेच प्राप्त झाली. अमरापूरकर नगरला आले की, शाळेला आवर्जून भेट देत, असे सांगत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छाया फिरोदिया यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.
अएसोचे पदाधिकारी व अमरापूरकरांच्या वर्गातील "स्नेहबंध 67' चे सभासद श्रद्धांजली वाहण्यासाठी शाळेत जमले होते. संस्थेचे सहकार्यवाह सुरेश भालेराव, नियामक मंडळाचे अध्यक्ष अशोक मुथ्था, खजिनदार शरद रच्चा, आशा कटारिया, धनंजय देशपांडे, गिरीश भालेराव, जवाहर मुनोत, मुख्‍याध्यापक बाबुराव ठोकळ, नंदकिशोर भावसार, कुसुम मावची, विठ्ठल लोखंडे, वनिता गोत्राळ, प्रमोद जगदाळे, संध्या मकाशिर आदी यावेळी उपस्थित होते. फिरोदिया म्हणाल्या, मी व अमरापूरकर एकाच वर्गात होतो. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यांच्या कलेला वाव देणारे वातावरण शाळेत होते. स्नेहसंमेलनांत त्यांनी मोने कलामंदिर येथे अनेक नाटके सादर केली. त्यांच्या रंगीत तालमीही येथेच चालत. शाळेबद्दल त्यांच्या मनात आदर होता. ते नेहमी तो बोलूनही दाखवत. त्यांच्या संकल्पनेतूनच वेध प्रबोधन परिषद या उपक्रमाची सुरुवात झाली. यावर्षी या उपक्रमाचे 9 वे वर्ष आहे. अमरापूरकर पत्नी सुनंदा, मुलगी रिमासह दरवर्षी या कार्यक्रमास आवर्जून येत. नाटकांच्या वेळी घडलेल्या गमती-जमती सांगत. या वर्गात बसायचो, येथे खेळायचो असे सांगत. मोने कलामंदिर परिसरात तर तासन् तास घालवत. या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावे, यासाठी त्यांची नेहमी धडपड असे, असे फिरोदिया म्हणाल्या.