आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारांचेही ऐकेना महापालिका ; वारंवार केली सिद्धेश्वर मंदिरासमोरील कचरा हटवण्याची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सिद्धेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील कचराकुंडी, सार्वजनिक मुतारी, घाणीचे साम्राज्य यासंदर्भात वारंवार मागणी करूनही महापालिकेने कार्यवाही केली नाही, ही चिंतेची बाब आहे, असे सांगत आमदार प्रणिती शिंदे यांनी पुन्हा एकदा महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.
सिद्धेश्वर मंदिर परिसरात मोठय़ा प्रमाणात कचरा साठलेला आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. हा कचरा सोलापूर महापालिकेच्या वतीने वेळोवेळी उचलण्यासाठी तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. तसेच येथील कचराकुंडी हटवली पाहिजे. मंदिर परिसरातील कचरा उचलण्यासाठी संबंधितांना आदेश देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता व आरोग्य अधिकारी यांनाही देण्यात आली आहे.
सिध्देश्वर मंदिर आणि परिसरात कचर्‍याची समस्या वारंवार उद्भवते आहे. सिध्देश्वर देवस्थानही फारसे लक्ष देत नाही. माध्यमांतूनही याबाबत अनेकवेळा सचित्र बातम्या आल्या आहेत, त्याचीही दखल महापालिकेने घेतली नाही. आमदारांनी निवेदन देऊनही दुर्लक्ष झाले. त्यामुळे आता प्रणिती शिंदे यांना पुन्हा निवेदन द्यावे लागले आहे.
सिध्देश्वर मंदिरात जाण्यासाठी लक्ष्मी मंडईकडून एक गेट करण्यात आले आहे, तेथे तर घाणीचे साम्राज्यच आहे. गेटच्या जवळपास व्यावसायिकांची दुकाने आहेत, त्यामुळे वाहनेही तेथेच थांबलेली असतात. कचरा साचल्याने ये-जा करणे मुश्किल होते. हे नेहमीचेच चित्र आहे. आता पावसाळा आल्याने पावसाचे पाणीही मोठय़ा प्रमाणात साचते. आता आमदारांनीच या प्रo्नावर महापालिकेला पत्र दिल्याने महापालिका किती दखल घेते याकडे लक्ष लागले आहे.