आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर रोड ते पुणे रोड सांधला जाणार रेल्वेपुलाने...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: गर्डर पुलावर ठेवण्याची कसरत करताना क्रेन. छायाचित्रे: कल्पक हतवळणे
सोलापूर रोड ते पुणे रोडदरम्यानच्या बाह्यवळण रस्त्यावरील अरणगाव येथे सुरू असललेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा महत्त्वाचा टप्पा सोमवारी पार पाडण्यात आला. सोमवारी सकाळी रेल्वे रुळावरील उड्डाणपुलाच्या दोन बाजू जोडण्यात आल्या. या महत्त्वपूर्ण कामासाठी रेल्वे वाहतूक सकाळी दोन तासांसाठी थांबवण्यात आली होती. सकाळी १० वाजता स्टीलचा एक गर्डर बसवण्यात आला.
दुपारी पुन्हा रेल्वे वाहतूक थांबवून दुसरा गर्डर बसवण्यात आला. त्यासाठी अजस्त्र टेलिस्कोपिक क्रेन वापरण्यात आल्या. या कामावर देखरेख करण्यासाठी रेल्वेचे उपमुख्य अभियंता चंद्रभूषण सिंग, कार्यकारी अभियंता पद्मनाभ झा, वरिष्ठ शाखा अभियंता एस. आर. कोवर, संभाजी मुळे उपस्थित होते. पुलाच्या दोन बाजू जोडण्याचे काम मार्गी लागल्याने आता पुलाचे काम लवकर पूर्ण होऊन बाह्यवळण रस्त्यावरील वाहतूकही सुरू होणार आहे. शेजारील छायाचित्रात कामाच्या दरम्यान उतरवलेल्या विद्युतीकरणाच्या तारा पुन्हा जागेवर ओढताना कर्मचारी.