आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राळेगणसिद्धीत लवकरच कोटींचा सौरऊर्जा प्रकल्प, दररोज मेगावॅट वीजनिर्मिती शक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथे सिंचनासाठी स्वतंत्र सौरऊर्जा प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी कोटी खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पातून दररोज मेगावॅट वीजनिर्मिती होईल. सिंचनासाठी आवश्यक गरज भागवून उरलेल्या विजेची विक्री केली जाईल. ग्रामपंचायत राबवत असलेला हा राज्यातीलच नव्हे, तर देशातील पहिला प्रकल्प असल्याचा दावा उपसरपंच लाभेश आैटी यांनी केला.
राळेगणसिद्धी हे भारतातील आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. विविध प्रकल्प राबवून हे गाव स्वयंपूर्ण झाले आहे. हजारे यांच्या प्रयत्नांतून गावाचा कायापालट झाला. गावात राबवण्यात आलेल्या पुनर्भरण प्रकल्पांतर्गत कुकडी कालव्याचे पाणी ६५० अश्वशक्तीच्या विद्युतपंपाने टेकडीवर नेले जाते. या माध्यमातून परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. यादवबाबा पाणी उपसा संस्थेच्या माध्यमातून हा प्रकल्प चालवला जातो. ही योजना चालवण्यासाठी वर्षाकाठी १५ ते २० लाख रुपये वीजबिल येते. वसुलीत अडचणी येत असल्याने ही योजना शासनाकडे द्यावी, असा विचार पुढे आला. तथापि, हा प्रकल्प सौरऊर्जेवर चालवल्यास वीजबिलापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळेल, अशी कल्पना हजारे यांनी मांडली. तसा ठराव मागील ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. सरपंच मंगल पठारे उपसरपंच लाभेश आैटी यांनी पुढाकार घेत या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू केला.

"मेडा'कडे (महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी) हा प्रस्ताव सादर करण्यात आला. कालव्यावर प्रकल्प उभारल्यास जमिनीसाठी वेगळी गुंतवणूक करावी लागणार नाही, असा विचार पुढे आला. केंद्राच्या धोरणानुसार या प्रकल्पाला ३० टक्के अनुदान उपलब्ध होणार आहे. उर्वरित निधी १४ वा वित्त आयोग, जिल्हा नियोजन, आमदार खासदार निधी, तसेच विविध कंपन्यांच्या सीएसआरमधून उपलब्ध होऊ शकतो. या प्रकल्पाला "मेडा'ची तत्त्वत: मान्यता मिळाली आहे, तसेच पाटबंधारे विभागानेही हिरवा कंदील दाखवला आहे.

हा प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर तो ग्रामपंचायत मालकीचा होईल. निर्माण होणारी अतिरिक्त वीज "महाजनको'ला विकण्याचेही नियोजन आहे. या प्रकल्पामुळे महावितरणच्या बिलापासून सुटका तर होईलच, त्याबरोबर उत्पन्नाचे नवीन स्त्रोतही उपलब्ध होतील.

नऊ महिन्यांत प्रकल्प पूर्णत्वास
^या प्रकल्पासाठी महिने लागतील. या विजेचा उपयोग चार-पाच संस्थांना होईल. उर्वरित वीजविक्रीतून ५० लाख मिळतील. कोणाला वीज विकायची हे दर निश्चितीनंतरच ठरेल. जास्त दर देईल, त्यांना वीज विकली जाईल.'' लाभेशआैटी, उपसरपंच, राळेगणसिद्धी.

पुढील आठवड्यात चर्चा
^मीसमन्वयकम्हणून या प्रकल्पाचे काम पहात आहे. या प्रकल्पामुळे वीजबिलाचा मोठा खर्च वाचू शकेल. पुढील आठवड्यात वीजविक्रीबाबत "महाजनको'शी चर्चा होणार आहे. विविध खासगी कंपन्या त्यांचा सीएसआर राळेगणसिद्धीला देण्यास तयार होतील. त्यानंतर प्रकल्पासाठी लागणाऱ्या इतर निधीसाठी प्रयत्न केला जाईल.'' दिलीपवडे, विद्युत अभियंता, जिल्हा परिषद.

कोटी ४० लाखांची होणार वीज निर्मिती
सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षभरात १६ लाख युनिट वीजनिर्मिती होणार आहे. बाजारभावाप्रमाणे यातून सुमारे कोटी ४० लाखांची वीज निर्माण होऊ शकते. पुनर्भरण प्रकल्पाबरोबरच इतर विजेची गरज भागवून उर्वरित विजेची विक्री करून राळेगण ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती अधिक भक्कम होईल.
बातम्या आणखी आहेत...