आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौर वीजपंप बनेल शेतक-यांचा आधार, नाबार्डच्या योजनेत अनुदान व कर्ज उपलब्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- भारनियमन व वाढणारे वीजदर या पार्श्वभूमीवर सौरऊर्जेवरचे पंप शेतक-यांसाठी मोठा आधार ठरतील, असे मत उद्योजक व झेनिथ सोलर सिस्टिम्सचे अमेय मुदकवी यांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागात विजेचा मोठा प्रश्न आहे. दिवसा वीज नसल्यामुळे उभ्या पिकांना पाणी देता येत नाही. या पार्श्वभूमीवर सौरउर्जेवर चालणारा उपसापंप शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकेल, असे सांगून मुदकवी म्हणाले, पाच अश्वशक्तीचा सौरपंप एका तासात सात हजार लिटर पाणी खेचतो. बोअरलची खोली ८०० फूट असली, तरी पंपाला अडचण येत नाही. सकाळी ९ पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत केवळ सूर्यप्रकाशावर हा पंप काम करतो.
नाबार्डच्या योजनेंतर्गत ५ अश्वशक्तीच्या पंपाची किमत ५ लाख ४० हजार असून त्यावर २ लाख सोळा हजारांचे अनुदान व तेवढेच कर्ज मिळते. शेतकऱ्याला केवळ १ लाख ८ हजार रूपये भरावे लागतात. कोणतीही राष्ट्रीयीकृत बँक या पंपांसाठी कर्ज देऊ शकते. कर्जाची परतफेड ३ ते १० वर्षांत करता येते. ही योजना शहरातील मोठ्या इमारती, तसेच सोसायट्यांसाठीही उपलब्ध आहे. त्यासाठी अनुदान मिळू शकेल. प्रत्येक घरातही अशी छोट्या प्रमाणावर वीज तयार करता येऊ शकेल. त्यासाठी "ड्युएल मीटर' लागेल. घरावरील सोलर पॉवर पॅकमधील वीज गरजेपुरती वापरून उरलेली महावितरणला देऊन त्याचे पैसे संबंधितांना मिळू शकतील, असेही मुदकवी यांनी सांगितले.